खबर महाराष्ट्राची न्युज: जागतिक महिला दिन आणि महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त महाविद्यालयात गृह अर्थशास्त्र व समाजशास्त्र विभागा द्वारा लैंगिक समानता या विषयावर दिनांक ०८/०३/२०२३ पोस्टर सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली .या संदर्भात भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहे .

या वर्षात लैंगिक समानतेची काय स्थिती आहे .स्त्रियांना सर्व क्षेत्रात समान दर्जा मिळतो का ? कोणते क्षेत्र कि ज्यात आज ही महिलांचा सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ वंदना वि .भागडीकर अध्यक्षस्थानी होत्या आणि परीक्षक व प्रमुख अतिथी म्हणून डॉ.अनुराधा एम. खाडे समाजशास्त्र विभाग निर्धन पाटील वाघाये आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज लाखनी उपस्थित होत्या. प्रा लिना गादेवार यांनी आपल्या प्रास्ताविका मध्ये स्पर्धेचा उद्देश, स्वरूप त्याचबरोबर विद्यार्थिनींचा विकासाकरिता महाविद्यालयात विविध प्रकल्प, शिबिर ,वर्कशॉप आयोजित केली जातात सांगितले

.या स्पर्धेत एकूण ४६ विद्यार्थिनी स्पर्धक म्हणून सहभागी होत्या प्रत्येक विद्यार्थिनींनी आपल्या पोस्टरचे सादरीकरण केले. त्यानंतर परीक्षक डॉ.अनुराधा एम .खाडे यांनी विद्यार्थिनींच्या पोस्टर सादरीकरणावर आपले मत व्यक्त करून निकाल जाहीर केले. त्याचबरोबर आजही समाजामध्ये स्त्री आणि पुरुषांच्या अधिकारांमध्ये कशाप्रकारे तफावत दिसून येते स्त्रिया अनेक क्षेत्रात नोकरी करत असल्या तरी बरेच निर्णय .त्या स्वतः घेऊ शकत नाही. असे मत मांडले .

त्यानंतर स्पर्धेचे आयोजक डॉ क्षमा चव्हाण यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शनपर भाषण दिले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्ययांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जागतिक महिला दिन का साजरा केला जातो वर्तमान काळात महिलांच्या अधिकार बाबत चर्चा करून विद्यार्थिनीं स्वतःचा विकास कसा घडवून आणला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले त्याच बरोबर भारतीय समाजात थोर स्त्रियांचे काय योगदान आहे

हे समजून सांगितले.या स्पर्धेत प्रथम क्रमांक शितल तिवारी आणि लक्ष्मी पटले द्वितीय क्रमांक श्रुती चांदेकर तृतीय क्रमांक रश्मी खेडकर आणि शालू तुरकणे या विद्यार्थिनींनी क्रमांक पटकाविला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी वांढरे व आभार प्रदर्शन तनू कुंभारे
महाविद्यालयाचे प्राध्यापक व बहुसंख्येने विद्यार्थिनी कार्यक्रमाला उपस्थित होत्या.बक्षीस पात्र विद्यार्थिनींना रोख बक्षीस देण्यात आली .




