spot_img
Saturday, December 13, 2025
HomeMaharashtra                       ...

                                              सनातन संस्था न्यासातर्फे बालसंस्कार शिबीर संपन्न.

स्नेहा गद्देवार ( कार्यकारी संपादक )

मुल: -समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत सनातन संस्था या न्यासातर्फे गुरुवार दिनांक १८ सष्टेंबर २०२५ रोजी विद्या मंदिर कॉन्व्हेंट मूल येथे बालसंस्कार शिबीर घेण्यात आले. सनातन संस्था या न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप,विनामुल्य वैद्यकीय तपासणी, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणाव मुक्त जीवन कसे जगावे,याविषयी प्रबोधन, असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. भावी पिढी संस्कारक्षम व्हावी या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. न्यासाच्या वतीने सौ.गिता कोंतमवार यांनी मार्गदर्शन केले .या उपक्रमासाठी शाळेच्या अध्यक्षा सौ.अनिता मोगरे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनिषा खोब्रागडे आणि इतर शिक्षकवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले .या उपक्रमाचा लाभ १०८ विद्यार्थ्यांनी घेतला.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे