(मनिष रक्षमवार)
काही लोकांना प्रशासनाची साथ मिळाली किंवा पाठबळ मिळाले तरी त्यांचा वेगळाच नूर असतो. त्यातल्या त्यात पोलीस दलाची साथ असेल तर मग बोलायलाच नको. परंतु, महाराष्ट्र पोलीस दल पाठिशी असून स्वतःच्या फायद्यासाठी नव्हे तर पोलिसांच्या आणि समाजाच्या मदतीसाठी धावून जाणारे व्यक्तिमत्त्वं वेगळीच असतात. असेच एक व्यक्तीमत्त्व म्हणजे उदय आठल्ये. एक सच्चा पोलीस मित्र म्हणून उदयची राज्यात ओळख असून दिनांक 18 रोजी त्यांचा वाढदिवस साजरा होत असून त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा…
प्रामाणिक व निस्वार्थी पोलीस मित्र…
पोलीसांच्या बाबतीत उदय आठल्ये हे नेहमी प्रामाणिक व सकारात्मक असतात. हे राज्यातील अनेक पोलीस अधिकारी व अमलदार यांना माहीत आहे.पोलीसांच्या चांगल्या कामाचे कौतुक सर्वं सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी उदय आठल्ये हे सर्व दुर परिचित झाले आहेत. बरेच पोलीस मित्र स्वार्थी व वादग्रस्त निघाले. म्हणून पोलीस मित्र संकल्पना बंद होण्याच्या मार्गावर असताना. खरा पोलीस मित्र समोर आला आहे.राज्य पोलीस दलातील एखाद्या पोलीसावर अन्याय झाल्याचे कळताच उदय आठल्ये हे त्या पोलीसाच्या पाठीशी उभे राहतात.कोणताही बडेजावपणा न करता कोणतीही अपेक्षा न ठेवत व पोलीस दलात हस्तक्षेप न करता आपली भुमिका मांडताना दिसतात.आपल्या लेखनातून पोलीसांच्या चांगल्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी उदय आठल्ये हे नेहमी अग्रेसर राहीले आहेत.यात तीळ मात्र शंका नाही..

प्रामाणिक कार्याचा अनेकांनी केला सन्मान..
▪️कोविडच्या काळात पोलीस दलासाठी केलेल्या उपक्रमाची राज्याचे तत्कालीन गृहमंत्री श्री.अनिल देशमुख यांनी दखल घेत पोलीस मित्र उदय आठल्ये यांचे कौतुक केले होते..
▪️देशाचे माजी गृहमंत्री श्री.सुशीलकुमार शिंदे यांनी देखील पोलीस मित्र उदय आठल्ये यांचे कौतुक करत एक सच्चा पोलीस मित्र म्हणून शुभेच्छा दिल्या ..
▪️कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते सातारा जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्रमात उदय आठल्ये यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले होते..
▪️सातारा तालुका पोलीस स्टेशन यांनी कोविडच्या काळात पोलीस दलासाठी केलेल्या उपक्रमाची सन्मानचिन्ह देऊन केला गौरव…

अल्पावधीत काळातच साता-याचा तारा म्हणून नाव लौकिकास योग्य न्याय देवून पोलीसाची वर्दी आणि कार्याची दर्दी । ठरलेले एक व्यक्तिमत्व म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वाशी राष्ट्राप्रती एकनिष्ठ राहणारे साताऱ्याचे खरे पोलीस मित्र उदय आठल्ये आपणास वाढदिवसाच्या व उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा…




