समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत सनातन संस्था या न्यासातर्फे शुक्रवार दिनांक २५ जुलै २०२५ रोजी श्री जिवन कोंतमवार, वार्ड क्र १४,मुल येथे प्रथमोपचार शिबीर घेण्यात आले.
सनातन संस्था या न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप,विनामुल्य वैद्यकीय तपासणी, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणाव मुक्त जीवन कसे जगावे,याविषयी प्रबोधन, असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.
आपत्काळात स्वतःचे आणि इतरांचे रक्षण करण्यासाठी प्रथमोपचार शिकणे काळाची गरज आहे हा उद्देश ठेऊन या न्यासाने उपक्रम घेतले .सनातन संस्था या न्यासाच्या वतीने सौ.लता समर्थ यांनी मार्गदर्शन केले .या उपक्रमासाठी सौ. निता आयलनवार यांनी परिश्रम घेतले या उपक्रमाचा लाभ १६ महिलांनी घेतला.




