मुल :- नगरपरिषदेचे आरक्षण जाहीर होताच, शहराच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. यंदा नगराध्यक्षपद ओ. बी. सी. प्रवर्गातील महिला’साठी आरक्षित झाल्याने, पुरुष गटात थोडी नाराजी दिसून येत आहे परंतु महिला गटातून या पदावर कोणाची लॉटरी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरात पारंपारिकरित्या काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना होत असतो. यंदाही हेच चित्र दिसण्याची चिन्हे आहेत.
भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांत आतापासूनच उमेदवारीसाठी पाठीमागून हालचाली सुरु झाल्या आहेत. होणाऱ्या आगामी निवडणुकीत शहरवासीयांची पसंती कोण राहणार सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, वकील, शिक्षक ,की अजुन कोण यामधून निवड होणार की आधीपासूनच राजकारणात सक्रिय आहेत त्यांची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे




