दिनांक 9 मे 2025 ते 12 मे 2025 या कालावधीत कोतवालबर्डी येथे ग्रामीण मिनी बिग बॉस च्या थीमवर निवासी उन्हाळी संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 8 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांचा समावेश होता. गडचिरोली ,मुल नागपूर च्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विद्यार्थाच्या कला गुणांचा विकास होण्याच्या दृष्टिने स्वयंशासन, नेतृत्वगुण ,व्यक्तिमत्व विकासाअंतर्गत वेळेचे व्यवस्थापन निणर्य घेणे ,समायोजन ,सहकार्याची भावना संगीत, योगा,प्राणायाम ,पांरपारीक खेळ,संप्रेशन कौशल्य,नेचर वॉक, नृत्य,आर्ट अन्ड क्राफ्ट यावर भर देण्यात आला. सायबर क्राईम पासून कसे सुरक्षित राहू यावर मार्गदर्शन केले गेले.शिबिराचा मुख्य उद्देश
विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दुर ठेवणे हा होता .शिबिराचे आयोजन डॉ.क्षमा डी. चव्हाण ,प्रा सीमा सोनवणे यांनी केले.शिबीर यशस्वी करण्याकरिता डॉ. डी आर. चव्हाण डॉ.रवी ठाकुर , डॉ.किशोर आसरे ,ग्रामपंचायत सरपंच तसेच श्री संजय धोटे ,विकी धोटे, श्री देवेंद्र बनाफर यांचे सहकार्य लाभले. अॅडोव्हकेट श्री. देशपांडे सरांचे यात महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. या शिबिरातर्फे विद्यार्थ्यांना पारीतोषिक व प्रमाणपत्र देण्यात आली.