spot_img
Sunday, April 19, 2026
HomeUncategorizedधानोरा तालुक्यातील वनपट्टे व शेतकऱ्यांच्या समस्यांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांशी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे...

धानोरा तालुक्यातील वनपट्टे व शेतकऱ्यांच्या समस्यांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांशी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची चर्चा

गडचिरोली – धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वनपट्ट्यांशी संबंधित प्रलंबित समस्यांबाबत तसेच इतर समस्यांना घेऊन *जिल्हाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे* यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

धानोरा तालुक्यातील अनेक शेतकरी वनपट्ट्यांच्या मंजुरी, नोंदीतील त्रुटी तसेच मालकी हक्काबाबत विविध अडचणींना सामोरे जात असून यामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. या सर्व समस्यांचा आढावा घेऊन त्या तात्काळ मार्गी लावाव्यात, तसेच प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यावे अशी मागणी महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी यावेळी केली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देऊन शेतकऱ्यांच्या समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष धानोरा प्रशांत कोराम, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, काँग्रेस कार्यकर्ते शेरखान पठाण, विपुल येलटीवार, देवराव चवळे, मनोहर नरोटे,  रामसाय हलामी, वासुदेव मेश्राम, मधुकर गावडे, अमरु जाळे, रावणशहा तुलावी, सखाराम नैताम, संताराम गावळे, राकेश पोटावी, विनोद मडावी, फत्तेसाय आचला, सुरेश आचला सह धानोरा तालुक्यातील इतर शेतकरी  बांधव उपस्थित होते.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे