spot_img
Friday, June 5, 2026
HomeUncategorizedबिंदास जिंदगी फाऊंडेशनला जाहीर करताना आनंद होत आहे की, घनश्याम लक्ष्मण संगिडवार...

बिंदास जिंदगी फाऊंडेशनला जाहीर करताना आनंद होत आहे की, घनश्याम लक्ष्मण संगिडवार यांची संस्थेच्या ‘पर्यावरण आणि वने विभाग – चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

एम.एस सी. गणित पदवीधर असलेले घनश्याम संगिडवार यांनी शिक्षण क्षेत्रात तब्बल ३५ वर्षांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य केले आहे. स्व. वामनराव गड्डमवार, माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या भारत शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेअंतर्गत विद्यालयात त्यांनी शिक्षक ते पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. २०२० मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांची सामाजिक कार्याची तळमळ आजही कायम आहे.

१९८५ पासून गणित व विज्ञान विषय शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रात प्रेरणा व मदत दिली आहे. प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता आणि समाजाभिमुख विचारसरणी यामुळे त्यांनी शिक्षक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली.

सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात त्यांनी सातत्याने उल्लेखनीय योगदान दिले आहे. व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, वन्यजीव संरक्षण, शेतकरी प्रश्न, जलसंधारण, पर्यटन विकास आणि सामाजिक जागृती यांसारख्या विविध विषयांवर त्यांनी प्रेरणादायी लेखन केले आहे. चंद्रपूरसारख्या जंगलव्याप्त जिल्ह्यात वन्यप्राणी व मानव संघर्ष कमी करण्यासाठी, रस्ते अपघातांमध्ये वन्यजीवांचे होणारे मृत्यू रोखण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्यासाठी त्यांनी विविध उपाययोजना व लेखनाद्वारे जनजागृती केली आहे.

नदी-नाले परिसरात कमी उंचीचे ब्रिज-कम-बंधारे उभारून जलपातळी वाढविणे, हरितक्रांतीला चालना देणे, जंगल सफारी व पर्यटन विकास, पांदण रस्ते दुरुस्ती, वन्यप्राण्यांसाठी पाणवठे निर्माण करणे यांसारख्या विषयांवर त्यांनी शासनस्तरावर निवेदने व प्रस्ताव सादर केले आहेत. समाज संघटनांमध्ये अध्यक्ष ते सदस्य म्हणून कार्य करत त्यांनी सामूहिक विवाह सोहळे, परिचय मेळावे, सामाजिक मार्गदर्शन आणि विविध जनजागृती उपक्रम राबवले आहेत.

लेखन, ब्लॉगिंग आणि सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण विचार मांडले असून पर्यावरण, समाजजागृती आणि संस्कारक्षम समाज निर्मितीसाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. राजकीय प्रसिद्धीपासून दूर राहून समाजहिताला प्राधान्य देणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी आहे.

त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील दीर्घ अनुभवाची, पर्यावरण संवर्धनासाठी असलेल्या बांधिलकीची आणि सामाजिक कार्यातील सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेऊन संस्थेने त्यांच्यावर ‘पर्यावरण आणि वने विभाग – चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष’ पदाची जबाबदारी सोपवली आहे.

बिंदास जिंदगी फाऊंडेशन परिवारातर्फे . घनश्याम लक्ष्मण संगिडवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

त्यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण संवर्धन, सामाजिक जागृती आणि जनहिताच्या विविध उपक्रमांना अधिक व्यापक दिशा मिळेल, असा आम्हास विश्वास आहे.

त्यांच्या पुढील सामाजिक व पर्यावरणीय वाटचालीस बिंदास जिंदगी फाऊंडेशनकडून मनःपूर्वक शुभेच्छा.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे