spot_img
Sunday, April 19, 2026
HomeUncategorizedचांदापूर रस्तावर भीषण अपघात : एकाचा मृत्यू, तर 2 गंभीर जखमी…या घटनेमुळे...

चांदापूर रस्तावर भीषण अपघात : एकाचा मृत्यू, तर 2 गंभीर जखमी…या घटनेमुळे चांदापूर गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

मूल : राष्ट्रीय महामार्गावर मूल तालुक्यातील चांदापूर जवळ बूधवारी दिनांक 18 माच्र 2026 रोजी रात्रौ 9 वाजता च्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात चंदापूर येथील विवेक सुनील मुनगेलवार (वय 29) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 49 बी झेड7813 क्रमांकाची चारचाकी गोंडपिपरी वरून येत असताना,चांदापूर गावातील युवक फिरयाला जात असतांना जोरदार धडक दिली.
या धडकेनंतर पायी जाणारे युवक विवेक हा मरण पावला बाकी युवक 2 उपजिल्हा सरकारी दवाखाना मूल येथे भरतीआहेत.

विवेक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने मूल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे चांदापूर गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातात 2 युवक हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांना मूल उपजिल्हा रुग्णालयात शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी घटनेचा पंचनामा केला.गाडीच्या डायव्हरला पकडून ,गाडीला मूल पोलीस पोलीस स्टेशन ला लावण्यात आलेली आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे