अमरावती : नागरी हक्क संरक्षणचे पोलीसअधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथून मास्टर ऑफ जर्नालिझम हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. तसेच त्यामध्ये त्यांनी ७६ टक्के गुण प्राप्त करून विद्यापीठामधून प्रथम क्रमांक मिळाविला आहे. त्यांना मिळालेल्या यशाबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी व पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण विशाल आनंद यांनी कौतुक केले आहे.




