एक दिलदार मनाचा अधिकारी हरपला
वर्धा/ वडनेर.:- पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज वाढिवे काल रात्री कर्तव्यावरून आपल्या रूमवर गेले असता रात्री झोपेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला यातच त्यांचे निधन झाले. सकाळी सफाई कामगार रूमवर गेला असता पोलिस निरिक्षक मनोज वाढिवे काहीच हालचाल करीत नव्हते त्यांना रूग्णालयात नेण्यात आले तेंव्हा डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले. मनोज वाढीवे हे अधिकारी मनमिळाव व प्रेमळ स्वभावाचे अधिकारी होते त्यांनी चंद्रपुर ,भंडारा ,नागपूर ,गडचिरोली अशा विवीध जिल्ह्यात पोलिस स्टेशंन ला अधिकारी म्हणूण अधिकार बजावले होते त्यांचे मृतदेह शवविच्छेदनां करिता ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले. तसेच त्यांना वर्धा पोलीस अधीक्षक कार्यालयात मानवंदना देऊन प्रेत त्यांच्या स्वगावि नेऊन अंतिम संकार करण्यात येईल पुढिल तपास पोलिस करीत आहे




