spot_img
Sunday, April 19, 2026
HomeMaharashtraआर्थिक विवंचनेतून रेल्वे समोर उडी घेऊन इसमाने केली आत्महत्या

आर्थिक विवंचनेतून रेल्वे समोर उडी घेऊन इसमाने केली आत्महत्या

मूल (मनीष रक्षमवार ):आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलत एका विवाहित इसमाने गोंदिया-चंद्रपूर या धावत्या रेल्वेसमोर उडी घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी(दि.३) दुपारी १२ वाजता दरम्यान मूल तालुक्यातील बेलघाटा गावाजवळील रेल्वे गेटच्या जवळ घडली.बंडू राजन्ना नलूरवार वय ५० वर्षे वॉर्ड न.२ मूल असे मृत इसमाचे इसमाचे नाव आहे.

मूल शहरातील कुणबी मोहल्ला वार्ड नंबर २ येथे राहणाऱ्या बंडू नलुरवार यांचे कपडे प्रेस करायचे छोटेशे दुकान होते.मात्र मिळणाऱ्या उतपन्नातून कुटुंबाचा गाडा हाकणे शक्य नसल्याने मागील दोन महिन्यांपासून आर्थिक विवंचनेत होता.अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून पुढे आली.आर्थिक अडचणीमुळे नैराश्यात असलेले बंडू नलुरवार हे सकाळी घरून निघून मूल शहरापासून जवळपास ५ किमी अंतरावर असलेल्या सिंदेवाही मार्गावरील बेलघाटा गावाजवळील रेल्वे गेट च्या जवळपास उभे होते.दरम्यान गोंदियाकडून चंद्रपूर कडे येणारी रेल्वे येताच रेल्वे समोर उडी घेतली.यात बंडूच्या शरीराचे छिन्नविछिन्न तुकडे तुकडे झाले

.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पुलिस दाखल होवून मृतदेह शविच्छेदनासाठी मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.बंडूच्या दुर्दैवी मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.पुढील तपास मूल पोलीस करीत आहेत.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे