मूल : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळ अंतर्गत बल्लारपूर ते गोंदिया रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने २१ मे ला सकाळी ६ वाजतापासून तर २२ मे पर्यंत रात्री ८ पर्यंत वाहतूक मार्ग बंद राहणार आहे. यामध्ये केळझर, टोलेवाही, मूल मारोडा, मारोडा, बेलघाटा या रेल्वे स्टेशनचा समावेश आहे, अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.




