spot_img
Saturday, June 6, 2026
HomeMaharashtraमुल चे दबंग व कर्तव्यदक्ष तहसीलदार रविंद्र होळी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्याची...

मुल चे दबंग व कर्तव्यदक्ष तहसीलदार रविंद्र होळी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्याची धुरा सांभाळणार

तहसिलदाराचा बदल्यांचे सत्र

मूलचे तहसीलदार रवींद्र होळी यांची बदली आमगाव (जि. गोंदिया) येथे करण्यात आली. त्यांच्या जागेवर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या मृदुला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मूलचे तहसीलदार रवींद्र होळी एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून यांची ओळख आहे.

सहायक आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांची बदली; चार नवे तहसीलदार येणारचंद्रपूर : जिल्ह्यातील एक सहायक आयुक्त (नगर परिषद) व एका मुख्याधिकाऱ्यांसहचारतहसीलदारांच्या प्रशासकीय बदल्याकरण्यात आल्याआहेत. त्यांच्याऐवजी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. सहायक आयुक्त (नगर परिषद) अजितकुमार डोके यांची बदली भंडारा जिल्ह्यात मुख्याधिकारी पदावर, तसेच पोंभुर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशिष घोडे यांची बदली भंडारा जिल्ह्यात लाखांदूर नगरपंचायत मुख्याधिकारी म्हणून करण्यात आली. त्यांच्या जागेवर कुणालीही नियुक्ती देण्यात आलेली नसल्याने ही पदे रिक्त झाली आहेत. तहसीलदार श्रेणीत चंद्रपूरच्या तहसीलदार (संगायो) पदावर सीमा गजभिये यांची नियुक्ती झाली आहे. मूलचे तहसीलदार रवींद्र होळी यांची बदली आमगाव (जि. गोंदिया) येथे करण्यात आली. त्यांच्या जागेवर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या मृदुला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागभीडचे तहसीलदार मनोहर चव्हाण यांची बदली हिंगणा (जि. नागपूर) व बल्लारपूरच्या तहसीलदार कांचन जगताप यांची नागपूर येथे बदली झाल्याने या दोन्ही जागा रिक्त झाल्या आहेत. भिसीच्या अपर तहसीलदारांची धानोरा (जि. गडचिरोली) येथे बदली झालीहोते

. जागाही रिक्त झाली. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रिया कवळे यांची तहसीलदार (सामान्य) जिल्हाधिकारी कार्याल येथे बदली करण्यात आली. आशिष वानखेडे यांचीजिवती तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली. ते नागपूर येथील आयुक्तकार्यालयात होते.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे