खबर महाराष्ट्राची न्यूज / चंद्रपूर
गोंडपिपरी – तालुक्यातील येत असलेल्यांचा परसोडी येथे मानव व वन्य जीव संग्रह जनजागृती कार्यक्रम नुकताच पार पडला असून वाघ वाचवा जंगल वाचवा ह्या कलपथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. वनपरिक्षेत्र कोठारी अंतर्गत कलापथक युवा संग्रह बहुउद्देशीय मंडळ मारोडा ह्या संस्थेच्या माध्यमातून परसोडी येथे गावातील लोकांना प्रत्यक्ष आपल्या कलेतून वनविभाग कार्यालय कोठारी मार्फत ग्रामस्थांना जंगली प्राण्यांची व वाघाची तस्करी करु नये. जंगलामध्ये एक एकटे फिरण्यास जाऊ नये व वाघाची शिकार बनू नये. असा संदेश कलापथकाच्या माध्यमातून देण्यात आला. ह्यावेळी उपस्थित वनविभागाचे कर्मचारी शेडगे ए.सी.एफ. वने व वन्यजीव मध्यचांदा , मुरकुटे मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी कोठारी, जाधव क्षेत्र सहाय्यक परसोडी, ए. एन. मोहूर्ले वनरक्षक परसोडी, प्रतापगिरवा वनरक्षक पाचगाव, विजय घोडमारे, ह्यांच्यासह परसोडी येथील सरपंच निलकंठ मत्ते, उपरपंच रजनीकांत चांदेकर, पोलिस पाटिल सुधाकर नारनवरे, तसेच गावातील ग्रामस्त उपस्थित होते.




