spot_img
Sunday, April 19, 2026
HomeMaharashtraबी एम सी कंपनीच्या नावावर मुल तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक

बी एम सी कंपनीच्या नावावर मुल तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक

मूल प्रतिनिधी
बदलत्या काळानुसार सामान्य शेतकरी सुद्धा नवनवीन प्रयोग करण्यासाठी प्रयत्नशील असून त्याच्या या प्रयोगशीलतेचाच फायदा काही कंपन्या आणी मानस उठवताना दिसत आहेत. असाच प्रकार मूल तालुक्यात घडलेला असुन बीएमसी सोशल वेल्फेअर सोसायटी नागपूरच्या कंपनीचे प्रकल्प अधिकारी असल्याचे सांगून मुल तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.अलीकडील काळामध्ये केंद्र सरकार सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणात चालना देत असल्यामुळे अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळतांना दिसत आहे. पण त्याच्या या प्रयोगशील शेतीचा फायदा उठवत बीएमसी सोशल वेल्फेअर सोसायटी नागपूरचे प्रकल्प अधिकारी असल्याचे सांगत अमित बांबोडे यांनी तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये पंधरा लोकांचा सेंद्रिय शेती करण्यासाठी गट बनवायचा हे सांगून प्रत्येकी तीनशे रुपये आणि गटप्रमुखांकडून तीन हजार रुपये याप्रमाणे रकमा घेतल्या. तसेच शेतकऱ्यांना काटेरी तार विहीर बोरवेल, शेततळे मच्छी खड्डा स्प्रिंकलर शेडनेट यासारख्या योजना वैयक्तिक सुरुवात पाहिजे असल्यास वैयक्तिक लाभाचे पैसे जमा करावे लागेल असे सांगत बऱ्याच लोकांकडून 3 हजार 6 हजार या स्वरूपात रक्कमा स्वीकारल्या. परंतु बरेच दिवस लोटल्यानंतरही शेतकऱ्यांना जेव्हा या कंपनीच्या माध्यमातून कोणताही लाभ मिळताना दिसला नाही. त्यावेळेस शेतकऱ्यांनी अमित बांबोडे यांच्या बद्दल माहिती काढणे सुरू केले . तेव्हा शेतकऱ्यांच्या लक्षात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार याचेशी संपर्क साधला. मंगेश पोटवार यांनी या गंभीर विषयाची दखल घेत तात्काळ मुलं पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुमित परतेकी याचेशी सर्पक साधत त्याच्या कानावर हा विषय घालून सर्व लोकांना मुलं पोलीस स्टेशनला नेऊन एपीआय सतीश बनसोड याचे कडे तक्रार अर्ज दाखल करून शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या अमित बाबोळे आणी त्याच्या मोरक्या ला अटक करून न्याय देण्याची मागणी केली.
यावेळी कंपनीच्या माध्यमातून फसवणूक झालेले महिला पुरुष शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

शेतकऱ्याना खोटे आमिष दाखऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्या या टोळीचा शोध तात्काळ घेऊन कडक कारवाई करावी. मंगेश पोटवार तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे