प्रश्नोत्तरे पद्धतीने रंगला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन चर्चा सत्र.
ने.ही.विद्यालय मुलांची शाळेचा एक स्तुत्य उपक्रम.
मित्रांनो सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे जो ह्या स्पर्धेमध्ये टिकला त्याचेच भवितव्य सुखकर व समृद्ध होणार हे नक्कीच. असेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून आतापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करून त्यांना भविष्यासाठी सक्षम बनविणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून ने.ही. विद्यालय मुलांची शाळा येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम व चर्चासत्र आयोजित करण्यात आला. त्यामध्ये नुकताच राज्यसेवा परीक्षा मध्ये पीएसआय पदी निवड झालेल्या मौसम मोहुरले यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सुसंवाद साधण्यात आला. वरील चर्चासत्रात इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचे संपूर्ण विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले व त्यांची उत्तरे पी. एस.आय. मोसम मोहूर्ले यांनी दिली.

चिमुकल्या इयत्ता पाचवीच्या महेश वठे या विद्यार्थ्याने असा प्रश्न विचारला त्यावेळी सगळे स्तब्ध झाले. पीएसआय बनण्यासाठी बॉडी बनवावी लागते काय? पण त्याच्या या अनोख्या प्रश्नाचा निवारण अतिशय उत्तम उदाहरण देऊन भावी पी.एस.आय मौसम मोहूर्ले यांनी उदाहरण देऊन स्पष्टीकरण दिलं आणि विद्यार्थ्यांना खरोखरच समाधान झाल. वरील कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक जी.एन.रणदिवे सर, उपमुख्याध्यापक श्री .नाईक सर पर्यवेक्षक श्री नाकाडे सर, श्री पराते सर व श्री वदनलवार सर श्री. शुभम बाडे प्रमुख उपस्थित होते. प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये असे स्तुत्य उपक्रम झाले पाहिजे व विद्यार्थ्यांच्या मनातील स्पर्धा परीक्षांची भीती काढली पाहिजे. जिद्द आणि कष्टाच्या बळावर परिस्थिती वरती मात करून सुद्धा यश संपादन करता येते. असे पी एस आय मौसम मोहुर्ले ह्यांनी स्पष्ट केले. वरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. देशमुख सर यांनी केलं व आभार देशमुख मॅडम यांनी मानले.




