spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraअवैध दारू वाहतूक करतांना सावली पोलिसांनी केले अटक

अवैध दारू वाहतूक करतांना सावली पोलिसांनी केले अटक

आरोपी गडचिरोली जिल्ह्यातील रहिवाशी

सावली :आज दिनांक 28/07/23 रोजी चे 16:30 वा दरम्यान मुल कडून गडचिरोली येथे चार चाकी वाहनाने अवैध दारू वाहतूक होणार आहे अशा माहितीवरून सापळा रचून नाकाबंदी केली असता संशयित वाहन maruti wagon R क्र. MH 33 A 6399 थांबवून चेक केले असता त्यामध्ये रॉकेट संत्रा कंपनीचे देशी दारू एकूण 26 बॉक्स मिळून आले आहे. मिळून आलेले नमूद वाहन की. 2 लाख 50 हजार ,26 देशी दारू बॉक्स की 85,800 रु व मोबाईल की 10,000 रु असा एकूण 3,45,800 रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी नितीन विजयराव सातरे वय 34 वर्ष राहणार गोकुळ नगर गडचिरोली आहे.गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरू आहे. सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे व ठाणेदार आशिष बोरकर यांचे मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल दिलीप मोहूर्ले, पोलिस नाईक विशाल दुर्योधन, धीरज पिदुरकर, अशोक मडावी, जगदिप वाघमारे, विजय कोटणाके, निलेश राऊत, कपिल भंडारवार , गणपत मत्तामी यांचे पथकाने केली.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे