मोरवाही हे गाव मुल तालुक्यापासून ८ की.मी.आंतरावर असून गावातील विद्यार्थी व गावातील इतर ये जा करणारे प्रवासी यांना कुठलीही वाहक साधन सुविधा आज पर्यंत उपलब्ध नव्हती, मोरवाही हे गाव जांगलव्याप्त गाव असल्यामुळे हिंसक प्राण्यापासून गावात धोक्याचे व भीतीचे सावट पसरले होते,वाघ आणि अस्वलीच्या हमल्यात गावातील एका महिलेला आपला प्राण गमवावे लागले तर एक बालक आणि एक वृद्ध जखमी केले.अश्यातच शिवसेनेच्या(ऊ.बा. ठा) कार्यावर विश्वास ठेवत गावातील युवक शिवसेनेत प्रवेश केला आणि गावातील मुख्य समस्या ये जा करीता बस सेवेची मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांचे कडे केली,ही मागणी अतिशय गंभीर असून शिवसैनिक व पदाधिकारी घेऊन बस स्थानक आगार प्रमुख ला घेराव करण्यात आला. या गावातील लोक रोजी रोटी साठी तसेच शालेय शिक्षणा साठी, बी बियाणे व इतर कामासाठी मुल येथे ये जा करतात,ये जा करिता कुठलीच गावात सुविधा नव्हती,त्या मुळे शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांचे नेतृत्वात विद्यार्थ्यानं साठी बस सेवेला प्रथम प्राधान्य देत गावातील युवक तरुण शालेय विद्यार्थी,महिला,पुरुष व असंख्य शिवसैनिक यांना घेऊन बस स्थानक आगार ला घेराव केला व
तात्काळ बस सेवा सुरू करावी या करिता निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती,लगेच विभागीय वाहतूक अधिकारी रा. प.चंद्रपूर यांचे शी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून आठवडा भाराच्या आत समस्या मार्गी लावने करिता विभागीय अधिकारी यांना ठणकावून सांगितले असता वी.अधिकारी यांनी आठवडा भराची वेळ मागून सर्वे करून तात्काळ बस सेवा सुरू करून देण्याची हमी भ्रमणधवनी द्वारे देण्यात आली होती,आणि तात्काळ एका आठवड्याच्या आत बस सेवा सुरू झाली,यावेळी गावात आनंदाचे वातावरण झाले आणि गावातील शिवसैनिक यांनी बस चालक वाहक यांच स्वागत केले,.यावेळी उपस्थितीत शिवसेना शाखा प्रमुख गितेश घोडे युवासेना शाखा प्रमुख अजय ठाकुर,सरपंच श्रीमती.अनुराधाताई नेवारे,सौ.ज्योतीताई मेश्राम, कुंदाताई पाल,अरविंद सोनटक्के,प्रणय पाल अल्पित खोब्रागडे,नागेंद्र नागोसे, बंडू राऊत,मनोज झडकर,रोहित पेंद्राम,अभिजित ठाकरे,
व असंख्य शिवसैनिक युवासैनिक महिला आघाडी,शालेय विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते.




