spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraपोहायला गेलेली तीन मुले वर्धा नदीत बुडाले

पोहायला गेलेली तीन मुले वर्धा नदीत बुडाले

  • गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील घटना

खबर महाराष्ट्राची न्युज / चंद्रपुर
कार्यकारी संपादक / संदिप गव्हारे
गोंडपिपरी – चार मुले वर्धा नदीच्या पात्रात पोहायला गेले असता त्यातील एक मुलगा परत आला आणि तीन मित्र वाहून गेल्याचे सांगितलं असता गावाकर्यांनी लगेच नदी पात्राकडे धाव घेतली. नदी किनाऱ्यावर मुलांचे कपडे दिसून आलेत. ह्यासंबंधी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली आहे. प्रतिक नेताजी जुनघरे, निर्दोष ईश्वर रंगारी, सोनल सुरेश रायपुरे अशी बेपत्ता असलेल्या मुलांची नावे आहेत. सर्व मुले दहा वर्ष वयोगतील असून गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथे ही दुदैवी घटना घडली आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. अद्याप मुलांचा शोध लागलेला नाही.
प्राप्त माहिती नुसार, गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या तोहोगाव येथील प्रतिक नेताजी जुनघरे, निर्दोष ईश्वर रंगारी, सोनल सुरेश रायपुरे, आरुष प्रकाश चांदेकर ही चार मुले वर्धा नदी पात्रात पोहायला गेलीत. त्यापैकी आरुष प्रकाश चांदेकर हा घरी परत आला. त्याने तीन मित्र नदीत वाहून गेल्याचे गावात सांगितले. गावाकर्यांनी लगेच नदी पात्राकडे धाव घेतली. नदी पात्रजवळ मुलांचे कपडे दिसून आलेत. त्यामुळे मुले वाहून गेली असावी अशी शंका वाढली. मुलांचा आई वडीलानी एकच टाहो फोडला. पोलीस विभागाने घटनास्थळ गाठून शोध मोहीम सुरु केली आहे. अद्याप मुलांचा पत्ता लागलेला नाही. वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची वाढ झालेली आहे. त्यामुळे शोध मोहिमेत अडथळा निर्माण होत आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे