[ad_1]
Mumbai to Goa Vande Bharat Express Travel : मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी हायस्पीडमध्ये रेल्वेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची यशस्वी चाचणी घेतली गेली आहे. आता गोव्याहून ही एक्स्प्रेस पुन्हा मुंबईच्या दिशेने धावणार आहे. राज्यात मुंबई-शिंर्डी आणि मुंबई-सोलापूर मार्गावर वंदे भारत धावत आहे. आता कोकण रेल्वे मार्गावर ही नवी कोरी गाडी धावणार आहे.
[ad_2]




