spot_img
Saturday, July 19, 2025
HomeMaharashtraMaharashtra Budget 2023: शिंदे फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प; विरोधक आक्रमक तर सत्ताधारीही...

Maharashtra Budget 2023: शिंदे फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प; विरोधक आक्रमक तर सत्ताधारीही प्रतिहल्ल्याच्या तयारीत


Maharashtra Budget 2023 : शिंदे फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर होत आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याची चिन्हं आहेत. विरोधक आक्रमक असून सत्ताधारीही प्रतिहल्ल्याच्या तयारीत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच राज्याचे अर्थमंत्री म्हणून 2023 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हे बजेट शिंदे फडणवीस सरकारसाठी(Shinde Fadnavis government) अत्यंत महत्वाचा टास्क मानला जात आहे. या बजेटकडून महाराष्ट्रातील जनतेच्या खूप अपेक्षा आहेत (Maharashtra Budget 2023). 

अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याची चिन्हं दिसायला लागली आहे. विधीमंडळाचं बजेट अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्याआधीच विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. रस्त्यावरील लढाया थेट सभागृहात लढल्या जातील. सत्ताधारी भाजप – शिंदे गट आणि विरोधक महाविकास आघाडी हे दोन्ही गट एकमेकांची कोंडी करण्यासाठी रणनीती आखून तयार झालेत. 

शिंदे फडणवीस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असेल. नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकींनी विरोधकांचं मनोधैर्य उंचावलं आहे. त्याचे पडसाद अधिवेशनात उमटताना दिसतील. त्यातच शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हं निवडणूक आयोगाने शिंदे गटाला बहाल केल्याने त्याचेही पडसाद उमटतील. 

ठाकरे गटाच्या आमदारांना दोन आठवडे व्हीपपासून सुप्रीम कोर्टाने संरक्षण दिलंय. मात्र दोन आठवड्यांनी कोर्टाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला तर शिंदे गट शिवसेनेच्या आमदारांना व्हीप बजावून अडचणीत आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.  

अर्थसंकल्पात जनतेच्या सूचनांचे, संकल्पनांचे प्रतिबिंब असावे, यासाठी  उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या सूचना मागवल्या होत्या. या सर्व सूचनांचा विचार करुन हे बजेट तायर करण्यात आल्याचे समजते. 

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, अनिल परब आदी नेते उपस्थित होते. ही सदीच्छा भेट असल्याचं अजित पवारांनी म्हटले. 
अजित पवार यांता मुख्यमंत्री शिदेंवर गंभीर आरोप

वर्षा बंगल्याचं गेल्या चार महिन्यांतलं फक्त खानपानाचं बिल २ कोटी एवढं आल्याचा दावा अजित पवारांनी केला…वर्षावर चहा देता की सोन्याचं पाणी असा सवालही अजित पवारांनी केलाय. त्याला मुख्यमंत्री शिदेंनी प्रत्युत्तर दिलंय. पाहुण्याचं स्वागत ही आपली संस्कृती आहे. तुम्ही चहापाण्याचं काय काढता? असा प्रतिसवाल एकनाथ शिंदेंनी केला. 

सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच, आदित्य ठाकरे यांची जोरदार टीका

अधिवेशना पूर्वी वरळीत झालेल्या सभेत आदित्य ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. सभेपूर्वी आमचे बॅनर काढण्यात आले. यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला. डर अच्छा है असं म्हणत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केलीय. वरळीतल्या जांभोरी मैदानात ठाकरे गटाच्या निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हे गद्दारांचं सरकार अल्पायुषी असून ते लवकरच कोसळेल असा दावाही आदित्य ठाकरेंनी केला. 



संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे