spot_img
Saturday, December 13, 2025
Homeनांदेडनांदेड सिडको येथे गोळीबारात युवकाचा मृत्यू !

नांदेड सिडको येथे गोळीबारात युवकाचा मृत्यू !

खबर महाराष्ट्राची न्युज/ मनीष रक्षमवार

नांदेड : नांदेड शहरात गोळी बाराच्या घटना नित्याच्याच झाल्याने,नांदेडमध्ये गोळीबार आता नवीन राहीला नाही असंच म्हणावे लागेल.अशीच एक आज रात्री 9 वाजता घडली आसुन,
नांदेडच्या सिडको भागातील जुन्या वसंतराव नाईक महाविद्यालयात समोर गोळीबार करून एकाची हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे शहर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली

.

सिडको येथील राज प्रदीप सरपे(२२) रा. सिडको हा रात्री ९ वाजताच्या दरम्यान सिडको येथील जुने नाईक महाविद्यालया समोरून जात असताना, अज्ञात मारेक-यांनी पिस्तुलमधून त्याच्यावर गोळीबार केला. यात गंभीर जखमी झाला. यानंतर पुढील उपचारासाठी त्याला विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अज्ञात मारेक-यांनी नेमकी हत्या कोणत्या कारणावरून करण्यात आली हे समजू शकले नाही. या घटनेनंतर आरोपी घटना स्थळवरून फरार झाला. या प्रकरणी वृत्त लिहीपर्यंत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे