spot_img
Monday, April 27, 2026
HomeMaharashtraYavatmal Crime : यवतमाळमध्ये दुहेरी हत्याकांड; तरुणांच्या हत्येनंतर रस्त्यावर फेकले मृतदेह

Yavatmal Crime : यवतमाळमध्ये दुहेरी हत्याकांड; तरुणांच्या हत्येनंतर रस्त्यावर फेकले मृतदेह

[ad_1]

Yavatmal Crime : यवतमाळमध्ये (Yavatmal News) खूनाचे सत्र थांबायचे नाव घेत नाहीये. आईनेच मुलाच्या हत्येचा कट रचल्याचे प्रकरण ताजे असतानाच दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ (Yavatmal Crime) हादरलं आहे. या घटनेनंतर यवतमाळमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावारण निर्माण झालं आहे. यवतमाळच्या कोळंबी जंगलात दोन तरुणांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. सोमवारी मध्यरात्री हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी  (Yavatmal Police) घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सोमवारी मध्यरात्री यवतमाळचे रहिवासी असलेल्या दोन तरुणांची हत्या करुन त्यांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आले होते. या दुहेरी यवतमाळमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अज्ञातांनी या दोन तरुणांची निर्घृणपणे हत्या करुन पळ काढला आहे. लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने दोघांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  रात्रीच्या सुमारास दोघे मोटरसायकलने भोसा परिसरातून कोळंबी फाट्यावर गेले होते. त्याचवेळी हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

गोलू उर्फ उज्ज्वल छापेकर (30, रा. डेहणकर ले आऊट, यवतमाळ) व अविनाश कटरे (32, रा. चापडोह पुनर्वसन, यवतमाळ) अशी मृतांची नावे असल्याचे समोर आले आहे. उज्ज्वल छापेकर हा त्याच्या वडिलांना सेंट्रिंगच्या व्यवसायात मदत करून मजुरीचे काम करत होता. तर अविनाश कटरे हा त्याच्यासोबत राहायला होता. सोमवारी रात्री बाईकवरुन घरी परतत असताना कोळंबी फाटा या गावातील जंगलाजवळ त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. आरोपींनी त्यांना बाईकवरुन खाली पाडले आणि बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने दोघांची हत्या केली. त्यानंतर मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला.

घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण, वडगाव जंगल ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळ उज्ज्वल आणि अविनाश दोघांचेही मृतदेह छिन्नविछन्न अवस्थेत आढळून आले. मृतदेहांच्या शेजारी समोसे देखील पडले होते. त्यामुळे तिथे दोघांपेक्षा जास्त आरोपी होते असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यवतमाळ ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

मुलाच्या हत्येसाठी आईनेच रचला कट

व्यसनाधीन व विक्षिप्त वागणाऱ्या पोटच्या मुलामुळे त्रस्त झालेल्या आईनेच मुलाला संपवल्या प्रकार यवतमाळमध्ये समोर आला आहे. 20 वर्षांपासून मुलगा सुधारायचे नाव घेत नसल्याचे पाहून निराश झालेल्या आईने कट रचत मुलाची हत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सहा आरोपींना अटक केली आहे.



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे