मुल शहरातील मुस्लिम मावळ्यांनी सामाजिक एकतेचा संदेश देणारी आगळी वेगळी शिवजयंती साजरी केली. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम होणे गरजेचे असल्याचं मत यावेळी मुस्लिम मावळ्यांनी व्यक्त केलं.
खबर महाराष्ट्राची न्युज मुल: शहरातील मुस्लिम मावळ्यांनी सामाजिक एकतेचा संदेश देणारी आगळी वेगळी शिवजयंती साजरी केली आहे. मूल येथे आज दिनांक १०/०३/२०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने .

प्रशांत रामचंद्र गट्टूवार, शिवसेना तालुका प्रमुख मुल यांचे नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणुक प्रभाग क्र २ सोमनाथ रोड मुल येथून सुरू होउन ते गुजरी चौक ते जामा मस्जिद मार्गे काढण्यात आली.

रॅलीचे जामा मस्जिद समोर जामा मस्जिद कमिटी मुल तर्फे मौलाना समशेर रजा, तौसिफ सय्यद, बबलू भाई कुरेशी, करीम शेख, लखिम शेख, अयुबखा पठाण, जावेदखा पठाण, जावेद मावाडिया यांचे द्वारे छञपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जातीय सलोखा राखण्याचे दृष्टीने शिव सैनिकांना व शिवजयंती चे पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात ‘जय शिवाजी, जय भवानी’ घोषणांनी परिसर निनादला




