खबर महाराष्ट्राची न्युज
राज नीमगडे ( प्रतिनिधी )
देशात अथवा राज्यात झालेला क्रीडा क्षेत्राचा विकास हा त्या देश-राज्याच्या प्रगतीचा एक टप्पा मानला जातो. त्यामुळे खेळ व खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन देण्याचे प्रत्येक शासनाचे धोरण असते, त्या धोरणाच्या माध्यमातून विविध योजना, उपक्रम शासन राबवित असते. महाराष्ट्र शासन देखील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण योजना, उपक्रम राबवित असून त्या माध्यमातून राज्यात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिले जात आहे..

दरम्यानच्या काळात क्रीडा क्षेत्रात झालेले बदल लक्षात घेऊन व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक विजेते खेळाडू तयार होण्यासाठी सन 2012 मध्ये अद्ययावत क्रीडा धोरण जाहीर करण्यात आले. या धोरणांची अंमलबजावणी राज्य व जिल्हास्तरावरुन विविध योजनांच्या माध्यमातून केली जात आहे. असे असले तरीही गडचिरोली सारख्या अतिदुर्गम, अतिशय नक्षलग्रस्त, भागात विविध कारणांमुळे महाराष्ट्रात व केंद्र सरकार पोहोचू शकत नाही त्याचा दुवा म्हणून ती जबाबदारी पोलिसांनी आपल्या खांद्यावर वारंवार घेतले आहे व ती उत्तमरीत्या पारही केली आहे. भामरागड सारख्या तालुक्यामधील खेळाडू सुद्धा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकू पाहण्याचे स्वप्न पाहत आहेत त्याचे कारण म्हणजे पोलिसांच्या माध्यमातून सरकार त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. त्यासाठी पोलीस वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून खेळाडूंना नेहमी प्रोत्साहन देत असते. त्याचीच प्रचिती म्हणून गडचिरोली जिल्ह्याची भामरागड एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी धावपटू प्रियंका ओक्सा हिने नुकत्याच दि.०६/०३/२०२३ रोजी गडचिरोली येथे झालेल्या महामॅरेथॉन स्पर्धा मध्ये १० किलोमीटर मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. व तिने हे पदक मिळवून भामरागड तालुक्याचा मान उंचावला आहे. या अगोदर सुद्धा तिने औरंगाबाद येथे 21 किलोमीटर महा मॅरेथॉन मध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता तेव्हा तिला आयोजकांकडून स्कुटी सुद्धा बक्षीस म्हणून मिळालेली आहे.तीचे समानार्थ लाहेरी पोलिसांनी आज लाहेरी पोलीस स्टेशन येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यादरम्यान उप पोस्टे लाहेरी हद्दीतील मौजा मल्लंमपोडुर या गावची प्रियंका ओक्सा हिला व तिच्या पाल्यांना तसेच मल्लमपोडुर गावातील नागरिकांना उप पोस्टेला बोलावून प्रियंका ओकसा हिस गडचिरोली येथे झालेल्या महा मॅराथॉन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला असल्याने तिला पोलिस स्टेशन लाहेरी तर्फे सत्कार करुन तीला मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमा दरम्यान लाहिरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री प्रशांत डगवार यांनी प्रियंकाचा सत्कार केला व भामरागड भागातील इतर खेळाडूंनी विद्यार्थ्यांनी व पाल्यांनी तिच्याकडून बोध घ्यावा व अधिकाधिक खेळाडूंना प्रोत्साहन करून आपल्या भागाचे व जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवावे असे आवाहन केले. त्यासाठी आम्ही कुठल्याही अडीअडचणीसाठी सदैव तुमच्या पाठीशी उभे राहू असे आश्वासन दिले. तसेच प्रियंका ओक्सा हिच्या यशाने गहिवरून गेल्याचे सांगत शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या प्रियंका ओक्सा हीचे गुण गाताना ते भावनिक झाले होते.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रियंका ओक्सा हिने आपले मनोगत व्यक्त करून थोडक्यात आपला संघर्ष सांगितला व आपल्या भागातील खेळाडूंनी पुढे येऊन आपलं कौशल्य आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवा व असे आवाहन केले.व पोलिस स्टेशन लाहेरीचे आभार मानले. सदर कार्यक्रमास भागातील प्रतिष्ठित नागरिक व लाहरी गावचे सरपंच राजेश्वरी बोगाणे, कवीश्वर मोतकूलवार, बालू बोगामी असे प्रतिष्ठित नागरिक हजर होते. हजर असलेल्या सर्व नागरिकांना फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची धुरा उप पोस्टे लाहेरी चे उपनिरीक्षक सचिन सरकटे यांनी सांभाळली तसेच आलेल्या महिलांचे , नागरिकांचे व प्रमुख पाहुण्यांचे व सदर कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेणारे एसआरपीएफचे व उप पोस्टे लाहेरी, सी आर पी एफ चे अंमलदार व अधिकारी यांचे आभार व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष लाहेरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रशांत डगवार हे होते. कार्यक्रमास सीआरपीएफ चे असिस्टंट कमांडर श्री स्वागत सर उपस्थित होते.तसेच लाहेरी गावचे तरुण युवतींन ,महिला वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.




