spot_img
Saturday, July 19, 2025
HomeMaharashtraखातेवाटप झालं, राज्यात प्रशासकीय बदलास सुरुवात, 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

खातेवाटप झालं, राज्यात प्रशासकीय बदलास सुरुवात, 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मंत्रिमंडळ खातेवाटप झाल्यानंतर राज्यात प्रशासकीय बदलास सुरुवात झाली असून १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य शासनाकडून करण्यात आल्या आहेत. दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी अनिल डिग्गीकर यांची बदली करण्यात आलेली आहे तर बेस्टमध्ये खांदेपालट करताना नवे महाव्यवस्थापक हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव राधाकृष्णन यांची महाजेनकोच्या अध्यक्षपदी बदली करण्यात आलेली आहे. महाजेनकोचे अध्यक्ष अनबाल्गन यांच्याकडे आता उद्योग विभागाच्या सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांच्याकडे कडे नागपूर टेक्सटाईल आयुक्त पदाची धुरा असणार आहे तर आयुक्त अविशांत पांडा यांची गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.

वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंची नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली झालेली आहे तर राज्य कर सहआयुक्त सी वनमाती यांची वर्ध्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सा वनमाती यांच्या जागी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सीईओ संजय पवार यांची वर्णी लागलेली आहे.विवेक जोन्सन हे चंद्रपूरचे नवे जिल्हा परिषद सीईओ असणार आहेत.

पुणे विभागीय महसूल उपायुक्त अण्णासाहेब चव्हाण यांची महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या सीईओपदी बदली करण्यात आलेली असून गोपीचंद कदम यांना सोलापूर स्मार्ट सिटी सीईओपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

  1. श्री अनिल डिग्गीकर (IAS:RR:1990) महाव्यवस्थापक, BEST, मुंबई यांची अतिरिक्त मुख्य सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  2. डॉ. हर्षदीप कांबळे (IAS:RR:1997) प्रधान सचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई यांची महाव्यवस्थापक, बेस्ट, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  3. डॉ.अनबलगन पी. (IAS:RR:2001) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, MAHAGENCO, मुंबई यांची सचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  4. डॉ. राधाकृष्णन बी. (IAS:RR:2008) मुख्यमंत्र्यांचे सहसचिव, मंत्रालय, मुंबई यांची महागेन्को, मुंबईचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  5. श्री संजय दैने (IAS:SCS:2012)जिल्हाधिकारी, गडचिरोली यांची आयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  6. श्री राहुल कर्डिले (IAS:RR:2015) जिल्हाधिकारी, वर्धा यांची महापालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  7. श्रीमती वनमथी सी. (IAS:RR:2015) सह आयुक्त, राज्य कर यांची जिल्हाधिकारी, वर्धा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  8. श्री संजय पवार (IAS:SCS:2015) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांची सहआयुक्त, राज्य कर, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
  9. श्री अवश्यंत पांडा, (IAS:RR:2017) आयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर यांची जिल्हाधिकारी, गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  10. श्री विवेक जॉन्सन (IAS:RR:2018) यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  11. श्री. अण्णासाहेब दादू चव्हाण (SCS पदोन्नती) उपायुक्त (महसूल) पुणे विभाग, पुणे यांची महात्मा फुले जिवंदाई आरोग्य योजना सोसायटी, मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  12. श्री. गोपीचंद मुरलीधर कदम (SCS पदोन्नती) यांची स्मार्ट सिटी, सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे