मूल ( मनोज मुंगमोडे प्रतिनिधी )तालुक्यातील बोरचांदली येथे वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभिर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 12 आगस्ट रोजी दुपारी घडली. विनोद भाऊजी बोल्लीवार वय वर्ष 36 राहणार बोरचांदली असे वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गुराखीचे नाव आहे.
बोरचांदली गावालगत असलेल्या जंगल परिसरात विनोद भाऊजी बोल्लीवार नेहमीप्रमाणे गाई म्हशी चरायला नेला होता. दबा धरून बसलेल्या वाघाने गुराखीवर हल्ला करून गंभिर जखमी केले. ही घटना गावात माहिती होताच गावकऱ्यांनी जखमी ला मूल उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपचाराकरिता नेले.