खबर महाराष्ट्राची न्युज
आला सण होळीचा लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा…. निष्पाप,निरागस,गोंडस मुलं ही देवाघरची फुलचं..
नवभारत विद्यालय मूल येथील गाईड शिक्षिका सौ.व्ही.एस.भांडारकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गाईड पथकांनी आपल्या खऱ्या कमाईतून गाठ्या विकत घेऊन गरजवंताच्या घरी जाऊन तेथील लहान मुलांच्या गळ्यात गाठी घालून त्यांना होळी सणाच्या शुभेच्छा दिल्या… खरचं दुसऱ्याला आनंद देण्यातचं आपल्याला आनंद मिळत असतो…याची प्रत्याक्षात प्रचीती आली….हा उपक्रम करतांना लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हालाही खुप आनंद झाला….
या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात परोपकाराची भावना निर्माण झाली.




