spot_img
Sunday, April 19, 2026
HomeMaharashtraभारतीय जनता पार्टी पोंभुर्णाचे वतीने पोंभुर्णा तालुक्यातील दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थीचा...

भारतीय जनता पार्टी पोंभुर्णाचे वतीने पोंभुर्णा तालुक्यातील दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थीचा सत्कार

दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीने पोंभुर्णा तालुक्यातील दहावी बारावी आणि नवोदय मध्ये गुणवंत ठरलेल्या विद्यार्थीचा शाल श्रीफळ शिल्ड पेन डायरी पाणी बॉटल टिफिन देऊन सत्कार करण्यात आले. नक्कीच सत्कार मुळे मुलांना पुढील आयुष्यात प्रेरणा मिळते आणि बाकी विध्यार्थीना सुद्धा मेहनत करण्याची जिद्द निर्माण होते. यातील गुणवंत विद्यार्थी त्यांच्या अभ्यासूवृत्ती जिद्द चिकाटीनेच यश प्राप्त केले आहे म्हणून त्यांच्या मेहनीतीचा हा सन्मान आहे असे मत अल्का आत्राम यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रांजली सातपुते विद्यार्थीने मत व्यक्त करताना वडिलांचा विश्वास सार्थ ठरविणार आणि हा सन्मानचा उपयोग माझ्या आयुष्यात होईल असे व्यक्त झाले.यावेळी 10 वी मध्ये तालुक्यात प्रथम आलेली प्रांजली मोहन सातपुते 94.40 %, दुसरी आलेली प्राची संजय सातपुते 94.20%, दुसरी संजना गद्देकार 94.20%, तन्मय अरविंद सातपुते 94.20%, तिसरा संस्कार सुनील जिदगीलवार 92.20%प्राप्त केले तसेच बारावी मध्ये तालुक्यात सुरेखा भाऊराव डेकाटे प्रथम 76%, दुसरी श्रद्धा प्रदीप लोणारे 74%.40, तिसरी आर्या अनिल देवावार 74.20% मिळवून यश प्राप्त केला तसेच तालुक्यातील नवोदय शिष्यवृत्ती साठी प्राप्त विध्यार्थी मुग्धा रोशन नैताम, अथर्व जोगेंद्र मडावी या विद्यार्थीचा सुद्धा सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी विध्यार्थीना शुभेच्छा दिल्या तर विद्यार्थीनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले त्यांना हा सन्मान पुढील जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देईल त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टीचे आभार मानले.

या सत्कार कार्यक्रमला अल्का आत्राम प्रदेश महामंत्री, सुलभा पीपरे नगराध्यक्ष, अजित मंगळगिरीवार उपनगराध्यक्ष, रवींद्र मारपल्लीवार सभापती कृषी उत्त्पन्न बाजार समिती, ऋषी कोटरंगे अध्यक्ष, ईश्वर नैताम महामंत्री, विनोद देशमुख माजी उपसभापती, तुळशीराम रोहणकर निराधार अध्यक्ष,गजानन मुदपूवार महामंत्री , गुरूदास पीपरे महामंत्री, दिलीप म्यॅकलवार,बंडू बुरांडे,नैलेश चिंचोलकर,मोहन चलाख, श्यामसुंदर बदन,सुनीता म्यॅकलवार,भारती बदन ताई, सुनंदा गोहने ताई संचालक,राजू ठाकरे उपस्थित होते. या कार्यक्रमचे प्रास्ताविक संचालन महेंद्र सोनुले यांनी केले तर प्रास्ताविक विनोद देशमुख यांनी केले.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे