spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraदुर्गम, अतिदुर्गम भागातील शिक्षकपुरक व्यवसायात व्यस्त?

दुर्गम, अतिदुर्गम भागातील शिक्षकपुरक व्यवसायात व्यस्त?

  • विद्यार्थी वाऱ्यावर…..
  • गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गवरअतिदुर्गम भागात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रव्हाहातआणण्याकरीता शाशन स्तरावर हातपाय मारले जात असताना ईकडे मात्र दुर्गम,अतिदुर्गम भागातील शिक्षक मंडळी शाळांना वाऱ्यावर सोडून इतर पुरक व्यवसायात मग्न असल्याचे विदारक चित्र बघावयास मिळत आहे. विशेषता गडचिरोली जिल्ह्यात हा प्रकार सऱ्हास बघायला मिळत असूनही शिक्षण विभाग मात्र याकडे गंभीरतेने बघत नसल्याने मोठी शंका उपस्थित होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात अवैध सावकारीचे लोण दुर्गम,अतिदुर्गम,आदिवासीबहुल क्षेत्रात पसरले आहे. अशिक्षीतपणा ग़रीबी व मजबुरीचा फायदा घेऊन

लठठ पगारी शिक्षक मंडळी या पुरक व्यवसायात मोठया संख्येने घुसल्याची गंभीर बाब पुढे येत आहे.शाळांना बुटटी मारून पैसे वाटप व वसुली या पुरक व्यवसायातच बेरीज,वजाबाकी,गुणाकार ,भागाकर
या शिक्षक मंडळींना वरिष्ठ अधिकारीलगाम लावीत नसल्याने इथेही सालेसोटे आहेत काय? हा सवाल उपस्थित झाला आहे. अवैध सावकारी सोबतच कमीशनवर भूखंड विक़ी व्यावसाय तेजीत आहे व यात मोठया संख्येने गुरुजी पुरक व्यवसायात व्यस्त स्प आहेत.परिवाराचे नावे कमिशनवर भुखंड व़िक़ी करताना गुरूजी मात्र शालेय वेळेत ग्राहकांचा शोध घेणे,भूखंड दाखवीने,सौदा करणे व यातून मोठा कमिशन कमविणे यातच गुंग झाल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

शाशकिय शाळामध्ये आधीच शिक्षकांची संख्या कमी आहे.व आता
जे शिक्षक आहेत त्यातील बरीच मंडळी लालसेपोटी आपल्या शै‌क्षणिक
कर्तव्याला लाथाडून पूरक व्यवसायासाठी बालगोपाल्यांच्या आयुष्याचे वाटोळे करीत असल्याचे वास्तव लपलेले नाही तसेच मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना सुद्धा कित्तेक शिक्षक राहात नसल्याचे चित्र दिसत आहे

वरिष्ठ अधिकारी या गंभीर बाबीपासूनअनभिज्ञ कसे? कार्यवाही का होत नाही? शिक्षकांनी अवैध सावकारी करणे कितपट योग्य आहे? अशा अनेक सवालांची उकल करावी लागणार आहे हे निश्चीत.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे