spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraलाचखोर वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात

लाचखोर वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात

वनविभागात खळबळ

गडचिरोली: आलापल्ली वनविभाग अंतर्गत येत असलेल्या पेरमिलीचे वनपरिक्षेत्र अधिकार्याला ५ लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. रस्त्याच्या कामावरील पकडलेले ट्रॅक्टर सोडण्यासाठी आणि दंड कमी करण्यासाठी त्याने १० लाख रुपयांची मागणी केली होती. प्रमोद आनंदराव जेनेकर असं लाचखोर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (४ जानेवारी) रोजी रात्रीच्या सुमारास केली.तक्रारदार रस्त्याचे काम करतो. तुमरगुंडा ते कासमपल्लीपर्यंत रस्त्याचे काम सुरू होते. त्या कामावर सुरू असलेले काही ट्रॅक्टर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेनेकर यांनी पकडली होती. ती वाहने सोडण्यासाठी व आकारलेले ७२ लाखांचा दंड कमी करण्यासाठी त्यांनी तब्बल १० लाखांची मागणी केली होती. तडजोड अंती ५ लाख रुपये देण्याचे ठरले. मात्र, संबंधित तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या अनुषंगाने सापडा रचण्यात आला असता, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेनेकर यांनी ५ लाख रुपयांचा लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. विशेष म्हणजे लाचखोर प्रमोद आनंदराव जेकर यांच्या पेमिळाले

शासकीय निवासस्थानी झळती घेतले असता ८५ हजार रुपये रोख रक्कमही मिळाले.

सदर कारवाई पेरमेली येथे करण्यात आली असून ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माणकीकर अँटी करप्शन ब्युरो नागपूर, सचिन कदम अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक श्रीमती अनामिका मिर्झापुरे अँटी करप्शन ब्युरो गडचिरोली, पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, सुनील पेद्दीवार, किशोर जंजारकर, संदीप घोरमोडे, संदीप उडान, नरेश कस्तुरवार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांनी केले.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे