spot_img
Saturday, June 6, 2026
HomeMaharashtraअवैध गोवंशाची तस्करी करणार्‍या वाह्नना सहीत आरोपीवर सावली पोलिसांची दमदार कारवाई

अवैध गोवंशाची तस्करी करणार्‍या वाह्नना सहीत आरोपीवर सावली पोलिसांची दमदार कारवाई

15 लाख 50 हजारांचा ऐवज जप्त

सावली: दिनांक 03/12/23 रोजी गडचिरोली दिशेकडून मुल कडे एका ट्रक मधून रात्री12:00 वाजता दरम्यान अवैध गोवंश वाहतूक होणार अशी गोपनीय माहिती मिळाली असता सापळा रचून संशयित ट्रक MH 40 CM 2614 थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये 35 गोवंश जनावरे क्रूरपणे तोंडाला मोरके व दोर बांधलेले दिसून आले.सदरची जनावरे गोशालेत दाखल करण्यात आले.


मिळून आलेले 35 जनावरे व बारा चाकी टाटा ट्रक किंमत असे मिळून एकूण 15,50,000 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींवर 1) शेख जाकीर शेख मेहबूब 2) इर्शाद उल्लाह खान किस्मत उल्ला खान दोन्ही रा.मुर्तीजापुर जिल्हा अकोला 3) मोहसीन अली मोबीन अली रा.आकोट जिल्हा अकोला यांचेवर संबंधित विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी साहेब, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू मॅडम यांचे मार्गद्शनाखाली ठाणेदार आशिष बोरकर यांचे नेतृत्वात सावली पो स्टे चे हेड कॉन्स्टेबल विशाल दुर्योधन, रामदास कोंडबत्तूवार, संजय शुक्ला, पो शि चंदू गंपलवार, विजय कोटणाके यांनी केली.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे