spot_img
Sunday, April 19, 2026
HomeMaharashtraएटापल्ली तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू.

एटापल्ली तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू.

  • 15 व्या दिवशी धडकले जिल्हा परिषद समोर .

खबर महाराष्ट्राची न्यूज / गडचिरोली
कार्यकारी संपादक / संदिप गव्हारे

एटापल्ली – आज 08 नोव्हेंबर 2023 रोजी तालुका एटापल्ली येथील आरोग्य कर्मचारी यांनी आंदोलन 15 व्या दिवशी सुध्दा चालू ठेवले असून 30 ऑक्टोबर 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत आझाद मैदान मुंबई येथे सर्व राज्यातील आरोग्य कंत्राटी कर्मचारी सरसकट समायोजन करिता कृती समितीच्या नेतृत्वात सहभागी झालेले होते. आरोग्य मंत्री यांनी 30 % पद्धतीने 3 टप्यात समायोजन करण्यात येईल व जेव्हा जेव्हा भरती निघेल त्यात समायोजन करण्यात येईल, असे आश्वासन दिलेले आहेत. परंतु सर्व कर्मचारी यांचे समायोजन सरसकट करून जो पर्यंत समायोजन अध्यादेश शासन काढणार नाही. तो पर्यंत संप मागे घेणार नाही अशी, ठाम भूमिका कृती समिती याने घेतली आहे.

NRHM अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरोग्य यंत्रणा ठप्प..!

NRHM अधिकारी व कर्मचारी जि.प. कार्यालय,गडचिरोली समोर आंदोलन करताना
➤15 दिवस लोटूनही शासनास जाग नाही.

राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्गत गेल्या 17 वर्षापासून कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनी 25 ऑक्टोबर 2023 पासून कायमबंद आंदोलन पुकारलेला आहे. यासाठी मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांनी शासनाची कानउघाडनी करून सदर कर्मचार्‍यांना शासन सेवेत दि. 31 मार्च 2023 पूर्वी सामावून घेण्याचे आदेश दिले. तसेच विधानसभा व विधान परिषदेत मा. सदस्य यांनी तारांकित प्रश्नाचे उत्तर देतांना मा. आरोग्यमंत्री यांनी सदर अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत शासन सकारात्मक असून दि. 31 मार्च 2023 पूर्वीच धोरणात्मक निर्णय घेण्याचे शासनाचे वतीने जाहीर केले.

   परंतु सदर बाबीस 6 महिन्यापेक्षा जास्तकाळ होऊनही शासन स्तरावरून कुठलेही पाऊल उचलण्यात  आले नसल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी  मागील 15 दिवसापासून कामबंद आंदोलन सुरु केले. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणेवर खूप मोठा प्रभाव पडल्याने शासनाने या आंदोलनाकडे गंभीरतेने घेऊन या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे असे आंदोलनकर्ते कर्मचारी यांचे म्हणणे आहे.
  सदर आंदोलन 15 दिवसापासून सुरु असल्यामुळे आरोग्ययंत्रणा विस्कळीत झाल्याने शासनातर्फे आंदोलन कर्त्यांना आंदोलन मागे घेण्याकरिता दबाव टाकण्यात येत आहे. जर यापुढे कंत्राटी कर्मचारी संपात सहभागी असतील तर त्यांची गैरहजरी अनधिकृत गृहीत धरून त्याच्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल असा आदेश काढण्यात आला.
संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे