spot_img
Sunday, April 19, 2026
HomeMaharashtraगानली समाज बहुउद्देशीय मंडळ अहेरीचा चा वतीने कोजागिरी चा कार्यक्रम संपन्न झाला

गानली समाज बहुउद्देशीय मंडळ अहेरीचा चा वतीने कोजागिरी चा कार्यक्रम संपन्न झाला

अहेरी: गानली समाज बहुउद्देशीय मंडळ अहेरीचा चा वतीने समाजाच्या सभागृहाच्या निर्मानाधिन ठिकाणी दि. २९/१०/२०२३ रोज रविवार ला कोजागीरीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात मान्यवाराचा हस्ते श्री मार्तंड खंडोबाच्या प्रतिमेला दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

मान्यवराचे पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजाचे प्रतिष्टीत श्री.व्येकटेशजी बोंमावार (कंत्राटदार ), श्री. अजयभाऊ कंकडालवार माजी जि. प. अध्यक्ष, श्री. श्रीनिवासभाऊ गद्देवार अध्यक्ष गानली समाज बहू. मंडळ, अहेरी
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सह-सचिव जुगल बोमनवार यांनी केली तसेच प्रस्तावना व संघटनेचे जमा-खर्च सचिव निलेश पुपरेड्डीवार यांनी केली.

मंचवरून श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी संघटनेतर्फे सुरु असलेल्या श्री मार्तंड खंडोबा रायचे मंदिर व सभागृहाचे कामाची स्तुती करीत येणाऱ्या काढत सर्व समाज बांधवांचा सहकार्याने बांधकाम पूर्ण करू अशी इच्छा व्यक्त केली.

मंचावरून श्री.राजूभाऊ बोंमावार यांनी समाजाला संबोधन करीत मंदिर व सभागृहाचा कामात तन मन धनाने आपले सहकार्य दिले तर मंदीर व सभागृह लवकरात लवकर पूर्णत्वास येईल.

कु. आरुश्री श्रीकांत गद्देवार ह्या चीमुकलिने आपले मनोगत व्यक्त करतांना समाज संघटितहोऊन एकजुटीने मंदीर निर्माणासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

तसेच संघटनेचे अध्यक्ष अध्यक्षीय भाषणातून श्री. श्रीनिवास भाऊ गद्देवार संघटनेचे पदाधिकारी मंदिर व सभागृह बांधकामासाठी अहोरात्र मेहनत घेवून राहीले वर्गणीसाठी बाहेर गावी गेलो असता तेथील समाज बांधवानी आपल्या अहेरीत सुरु असलेल्या कामाची स्तुती करून आमच्या सोबत घरोघरी वर्गणीसाठी फिरले त्यांचे मनापासून आभार मानले.

येणाऱ्या दिवसात मंदिर व सभागृहाचे संपूर्ण बांधकाम पूर्ण करू अशी इच्छा व्यक्त केली.

सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात समाजाचा महिला भगिनींनी मंगळगौरीचा व्रतावर सुंदरसा नृत्य सादर केले व बच्चा कंपनीने मोठया उत्साहाने गृप डान्स व सोलो डान्स सहभाग घेऊन कोजागिरी कार्यक्रमाची उत्साह द्विगुणित केला.

कार्यक्रमाचे शेवटी कोजागिरीचे दूध वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्याची तसेच सर्व समाज बांधव आणि महिला भगिनीचा मोलाचा सहकार्य लाभले

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे