spot_img
Sunday, April 19, 2026
HomeMaharashtraरुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उपजिल्हा रुग्णालय मुल येथील रिक्त पदे तात्काळ...

रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उपजिल्हा रुग्णालय मुल येथील रिक्त पदे तात्काळ भरा :- मंगेश पोटवार यांची मागणी

उपजिल्हा रुग्णालय मुल येथे एकूण 48 पदे मंजूर असून त्यात वैद्यकीय अधीक्षकासह अजून 13 पदे रिक्त आहेत. दिवसेंदिवस मूल तालुक्यातील रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आणि रुग्णालयात आवश्यक स्टॉप उपलब्ध नसल्यामुळे आहेत त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडून रुग्णांना योग्य उपचार घेताना अडचणी निर्माण होत आहेत.
उपजिल्हा रुग्णालय मुल येथे गेल्या काही दिवसांमध्ये आवश्यक त्यावेळेस रुग्णावर उपचार न झाल्यामुळे रुग्णांना जीव गमावण्याची वेळ आली. असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकानी केल्यामुळे वातावरण सुद्धा तंग झाले होते. रोज जवळपास सहाशे ते सातशे रुग्ण उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मुल येथे येत असून त्यात वृद्ध महिला पुरुष छोटे बालक यांचा समावेश आहे. रुग्णांची मोठी संख्या असल्यामुळे जवळपास रुग्णांना दोन ते तीन तास तब्येत बरी नसताना सुद्धा लाईन मध्ये ताटकळत उभे राहावे लागत आहे.


या सर्व समस्यांचे निराकरण व्हावे आणि तालुक्यातील रुग्णांना योग्य उपचार मिळावे या हेतूने चंद्रपूरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चिचोणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री नितीन भाऊ भटारकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने मुल तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार यांच्या नेतृत्वाखाली भेट घेत उपजिल्हा रुग्णालय मुल येथील वैद्यकीय अधीक्षकासह रिक्त पदे तात्काळ भरावे आणि रुग्णांना होणारी गैरसोय टाळावी अशी विनंती यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने केली.


यावेळेस शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मूल शहराध्यक्ष आकाश येसनकर याचे सह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे