गणेश शिंगाडे आष्टी प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्याच्या मध्यभागी असलेल्या आष्टी येथील ग्रामीण रुग्णालय म्हणजेच रुग्णांची सोय होण्याकरिता बांधलेले ग्रामीण रुग्णालय आष्टी, सविस्तर वृत्त असे आहे की आष्टीच्या आजूबाजू परिसरातील आष्टी ,इल्लुर, ठाकरी, कुनघा, चपराडा, चौडमपल्ली, बामनपेठ, मार्कंडा, अडपली ,अनखोडा, कोणसरी ,उमरी ,रामपूर, कडोली ,चंदनखेडी तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील राडापेठ,ता, विठ्ठलवाडा, शिवनी ,पानोरा, सालेझरी, मलेझरी अशा अनेक गावातून आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्ण उपचाराकरिता येत असतात तसेच भरती होत असतात आणि आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि पेशंट भरपूर प्रमाणात वाढत आहेत मात्र आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयाची छत निकृष्ट दर्जाची झाली असल्यामुळे त्या ठिकाणाहून पाणी टपकत आहे या ठिकाणी पाणी साचून राहिल्याने सफाई कामगाराला त्रास सहन करावा लागत आहे तसेच सफाई कामगार दिवसभर पाणी साफ करण्याचे काम करीत आहे या ठिकाणी एखादी पेशंट पडणार नाही काय किंवा एखादी पेशंट उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे आला असता त्याचा पाय घसरून पडून गेला तर त्याच्यावर उपचारावर उपचार करण्याची वेळ आष्टी ग्रामीण रुग्णालयात येणार असे चित्र दिसून येत आहे आज गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याची खमंग चर्चा जोरात सुरू आहे आणि त्यातच आष्टी ग्रामीण रुग्णालयात स्लॅब मधून पाणी गडत असल्यामुळे पाण्याचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे स्लॅपमधून टिप टिप बरसा पानी म्हणण्याची वेळ येत आहे याकडे जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली व जिल्हाधिकारी साहेब , तसेच या क्षेत्रातील लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय असा प्रश्न आष्टी ग्रामीण रुग्णालयात येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक करीत आहेत




