spot_img
Tuesday, April 21, 2026
HomeMaharashtraगोवंश वाहतूक करणारे पिकअप पकडले

गोवंश वाहतूक करणारे पिकअप पकडले

🔸३लक्ष८० हजाराचा मुद्देमाल जप्त

🔸कोठारी पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी कोठारी/सुरेश रंगारी
अवैधरित्या पिकअप वाहनात आठ गोवंश जनावरे वाहतूक करीत असलेल्या माहितीवरून कोठारी पोलिसांनी कोठारी- देवई फाट्यावर नाकाबंदी करून पकडण्यात यश आले.सदर घटना शुक्रवार दि.१८ ऑगष्ट सकाळी १० वाजताच्या दरम्यानची आहे.
मिळालेल्या माहितीनुसार देवई जंगली मार्गाने पिकअप मध्ये गोवंश जनावरे कोंबून अवैधरित्या वाहतूक करीत असल्याची खबर कोठारी पोलिसांना समजली.ठाणेदार विकास गायकवाड यांनी कोठारी-देवई फाट्यावर नाकाबंदी करून पिकअप क्र. एम एच ४०ए के ४१४८ वाहनास जेरबंद केले.वाहनांची तपासणी केली असता त्यात आठ पाळीव जनावरे आढळून आले.पोलिसांनी त्यास जप्त केले असून गोवंश व वाहन असा एकूण तीन लक्ष अंशी हजाराचा मुद्देमाल पकडून त्यावर गोवंश जनावरे वाहतूक प्रतिबंध कायद्यानवे फरार वाहन चालक व मालक यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार विकास गायकवाड,पोलीस अंमलदार सचिन पोहनकर,प्रवीण कडू यांनी केली आहे.
जनावरांची अवैध तस्करी देवई या जंगली मार्गाने तोहोगाव मार्गे तेलंगणा राज्यात करण्यात येते.या घटनेमुळे अविध गो तस्करी करनाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे