खबर महाराष्ट्राची न्युज (राज नीमगडे प्रतिनिधी)
15 ऑगष्ट 2023 मंगळवार रोजी” जनशिक्षण संस्थान, गडचिरोली येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या निमित्याने स्वातंत्र्य दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रमालामाला गजानन अलोने, डायरेक्टर जन शिक्षण संस्थान गडचिरोली, पचखेडे साहेब सहाय्यक संचालक, सांखिकी विभाग जिल्हा कार्यालय गडचिरोली, .

भाजीखायें व्यवस्थापक इंडियन बँकगडचिरोली यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात. गजानन अलोने, डायरेक्टर जन शिक्षण संस्थान गडचिरोली यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. सदरील ध्वजारोहण कार्यक्रमाला मान्यवर पचखडे साहेब सहाय्यक संचालक, सांखिकी विभाग जिल्हा कार्यालय गडचिरोली, गजानन अलोने, डायरेक्टर जन शिक्षण संस्थान गडचिरोली, केशव चव्हाण कार्यक्रम अधिकारी’ जन शिक्षण संस्थान, गडचिरोली’ . देवेंद्र तुमसरे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी. जय शिवहारे लेखाधिकारी, श्रीमती यामिनीमातेरे क्षेत्र सहाय्यक व सहलिपिक. दिवाकर मोहुर्ले संगणकचालक, श्रीमती योगिता अलोने प्रशिक्षक श्रीमती काजल येमनुरवारप्रशिक्षक तसेच जन शिक्षण संस्थानगडचिरोलीचे कर्मचारी वर्ग व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

ध्वजारोहण मार्गदर्शनात गजानन अलोने संचालक यांनी 15 ऑगष्ट हा भारतीयांचा एक खास दिवस आहे. या दिवासी स्वातंत्र्य सैनिकांना आणि स्वातंत्र्यासाठी लढलेल्या नेत्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. या विषयावर मार्गदर्शन केले. 15 ऑगष्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून अविरत स्वातंत्र्यदिन सोहाळ्यांचे आयोजन संपूर्ण भारतात साजरा केलाजातो . पचखडे सहाय्यक संचालक, सांखिकी विभाग जिल्हा कार्यालय गडचिरोली, यांनी उपास्तितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देवून स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान या विषयावर मार्गदर्शन केले.भाजीखाये व्यवस्थापक इंडियन बँकगडचिरोली यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत आहुती देणार् याविरांविषयी मार्गदर्शन केले.

त्यांनातरजन शिक्षणसंस्थानगडचिरोली च्या सभागृहात मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. केशव चव्हाण कार्यक्रम अधिकारी जन शिक्षण संस्थान गडचिरोली यांनी स्वातंत्र्य चळवळीत शहीद झालेल्या वीर पुरुष्यांच्या योगदान याविषयी मार्गदर्शन केले. यात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात मार्गदर्शन, भाषण, संभाषण, गीते, यासारखे अनेक उपक्रम राबविण्यात आले. सदारच्या कार्यक्रमाचे संचालन श्रीमती यामिनी मातेरे क्षेत्र सहाय्यक व सहलिपिक यांनी केलेव आभार प्रदर्शन. देवेंद्र तुमसरे सहाय्यककार्यक्रम अधिकारी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जय शिवहारे लेखाप्रमुख, व दिवाकर मोहूले वप्रशिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.




