spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraमुलाच्या मृत्यूस जबाबदार डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

मुलाच्या मृत्यूस जबाबदार डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

मूल स्थानिक उपजिल्हा रूग्णालयात भरती असलेल्या मुलाच्या उपचाराकडे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे मुलाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार द्वारका सुभाष गेडाम यांनी मूल पोलीस ठाण्यात केल्याने रूग्णालय प्रशासनात खळबळ माजली आहे.

द्वारका गेडाम यांनी सांगितले की, त्यांचा एकुलता एक मुलगा सुमीत गेडाम (२७) याला अस्वस्थ वाटू लागल्याने

दुपारी १२ वाजतादरम्यान मुलाची प्रकृती अचानक चिंताजनक झाल्याने त्यांनी कर्तव्यावर असलेल्या परिचारीकेची भेट घेवून उपचारासाठी डॉक्टरांना बोलावण्याची विनंती केली. त्यावेळेस संबंधित परिचारीकेने आपले म्हणणे ऐकुन न घेता उध्दट बोलून हाकलून दिले. काहीवेळाने रूग्णालयात भरती असलेल्या आकाश बेसनकर यांना मुलाच्या प्रकृतीची माहिती दिली तेव्हा ते मला डॉक्टरांकडे घेवून गेले. तेव्हाही डॉक्टरांनी मला गंभीर रूग्ण तपासाचे आहे, आता वेळ नाही, थोड्यावेळाने येतो, असे म्हणून परत पाठविले. हा प्रकार जावई डेव्हीड खोब्रागडे यांच्या कानावर टाकला तेव्हा त्यांनी स्वतः येवून

१० ऑगस्ट रोजी मूल उपजिल्हा रूग्णालयात मुलाच्या उपचाराकरिता डॉक्टरांना विनंती

उपचारासाठी भरती केले.केले. ११ ऑगस्ट रोजी केली. तेव्हाही डॉक्टरांनी दुर्लक्ष केले व तीन ते चार तासांनी रुग्णाला चंद्रपूर येथील जिल्हा रूग्णालयात घेवून जाण्यासचंद्रपूरला हलविले असता डॉक्टरांनी मुलाचा

मृत्यू झाल्याचे घोषित केले. ही बाब गंभीर असून मूलच्या रूग्णालयातील डॉक्टर आणि परिचारीकेच्या बेजबाबदारपणामुळेच मुलाचा बळी गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

🔸रूग्णाला भरती केल्यानंतर डॉ. कुळमेथे यांनी त्याची तपासणी करून योग्य उपचार केल्याने रुग्ण सुस्थितीत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता डॉ. बोमनवार यांनी रुग्णाची तपासणी करून सलाईन लावली. दुपारी २ वाजताच्या दरम्यान रुग्ण सुमीतच्या पोटात अचानक दुखू लागल्याने कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी तपासणी करून दुपारी ३ वाजता रूग्णाला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात घेवून जाण्याचा सल्ला दिला. रूग्णवाहिकेत ऑक्सिजन लावून रूग्णाला चंद्रपूरला रवाना केले. या सर्व घडामोडीत उपजिल्हा रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी हलगर्जी व बेजबाबदारपणा केला, असे वाटत नाही. वास्तविक रूग्ण हा सन २०१५ पासून एचआयव्हीबाधीत होता. रूग्ण एचआयव्हीबाधीत असल्याची माहिती रुग्ण भरती करताना दिली असती तर त्यानुसार त्यावर योग्य उपचार करता आले असते. परंतु उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर बेजबाबदापणाचा आरोप करणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्ण बाधीत असल्याची माहिती लपविली. –डॉ. देवेंद्र लाडे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रूग्णालय मुल

🔸मृत मुलाच्या आईने पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली. त्यानुसार योग्य तपास करण्यासाठी आम्ही मृत रूग्णाचे शवविच्छेदन करण्यास सांगितले. परंतु रुग्णाच्या नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. यामुळे तपासात अडचण निर्माण झाली असून वस्तुस्थितीची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल.

-सुमीत परतेकी, ठाणेदार, पोलीस स्टेशन मूल

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे