🔸पहील्याच दिवशी 80 ते 90 मोकाट जनावरांना घातले कोडवाड्यात
🔸माजी नगरसेवक मोती टहलियाणि यांचा पाठपुराव्याला यश
🔸सर्व प्रथम खबर महाराष्ट्राची न्युज ने घेतला होता हा विषय
मुल : शहरातील वर्दळीच्या रोडसह सर्वच प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांनी धुडगूस घातला आहे या मथळ्याखाली खबर महाराष्ट्राची न्युज ने पाठ पुरावा करुन बातम्या प्रकाशित केल्या होत्या तसेच जनावरांनी रस्त्यावर मांडलेल्या ठिय्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता . रस्त्यावरील मोकाट जनावरांना वगळून वाहने चालविताना अपघातात जखमी होत असून संपूर्ण शहरवासींना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता मुल येथील माजी नगरसेवक मोती टहलियाणी यांनी सतत या विषयवार पाठ पुरावा करुण विषय रेटून धरला होता .

पालिकेच्या दिरंगाईमुळे शहरात रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यात पावसामुळे गोठ्यातील जनावरांनी रस्त्यांवरच ठाण मांडल्याने तसेच रस्त्यांवर जनावरांचे कळप दिसून येत होते पावसामुळे जनावरांचा 24 तास मुक्काम रस्त्यांवरच दिसून येत आहे. वस्त्यांतील लहान रस्ते, प्रमुख सिमेंट रस्ते, डांबरी रस्त्यांवर जनावरांनी उच्छाद मांडला होता शहरातील मुख्य मार्गावर 2 दिवसांपुर्वीच मोठा अपघात झाला होता जनावरामुळे नागरिकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत होते आहेत. जनावरांनी रस्त्याच्या मध्यभागीच ठिय्या मांडल्याने वाहने काढावी कशी? असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे. रस्त्यांवरही मोकाट जनावरे दिसून येत आहे. रस्त्यांवरील जनावरांना बगल देत पुढे जाण्याचा प्रयत्न करताना नागरिकांचे अपघात होत आहेत. यात अनेकजण जखमी झाले तर काहींनी जनावरांच्या भीतीने ये-जा करण्याचा मार्गच बदलविला. एकूणच सध्या रस्त्यांवरील खड्डे आणि जनावरांची नागरिकांत चांगलीच दहशत निर्माण झाली होती या सर्व बाबींचा विचार करुण अखेर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अजय पाटणकर यांनी महामार्गावर सतत कर्मचारी तैनात करुन शहरातील मोकट जनावरांना कोडवाड्यात टाकण्याचा सपाटा सुरू केला काल रात्री पहील्याच दिवशी 80 ते 90 मोकट जनावरांना कोडवाड्यात टाकण्यात आले




