spot_img
Sunday, April 19, 2026
HomeMaharashtraजिल्हा वाहतुक सुरक्षा समिती कागदावरच?

जिल्हा वाहतुक सुरक्षा समिती कागदावरच?

अपघातांचे ब्लॅक स्पॉट केव्हा संपणार.

भाग…..६.

शाशनाची अधिकृत रस्ते वाहतुक समिती अस्तित्वात असते यापासून
सर्व साधारण जनता अनभिज्ञ असल्याचेच चित्र आहे.ही शाशन समिती प्रत्येक जिल्ह्यात अस्तित्वात असून त्या त्या जिल्यातील वरिष्ट
खासदार हे त्या महत्वपुर्ण समितीचे अध्यक्ष असतात.खा.अशोक नेते हे
या समितीचे आता चंदपूर जिल्ह्या अध्यक्ष आहेत.विशेष म्हणजे उप
प्रादेशिक परिवहन अधिकारी ( आर.टी.ओ.) हे या समिती चे पदसिध्द सचिव असतात. जिल्ह्याधिकारी,पोलिस अधिक्षक,सर्व उप विभागीय अधिकारी,पोलिसअधिकारी , जिल्ह्यातील सर्व आमदार
पदसिद्ध सदस्य असतात.

संपुर्ण मार्ग,महामार्गावर् अपघातांची संख्या कमी करणे,जनजागुती करणे,अपघातांचे ब्लॅक स्पॉट शोधून काढणे,उपाययोजना असे अधिकार
या समितीकडे असतात. पण चंदपूर जिल्हयातील ही समिती खरंच अस्तित्वात आहे का? असेल तर मूल शहरात वाढत चाललेली मोठया अपघाताची भिती व वाहतुकीची कोंडी शहरातून येरझारा मारणाऱ्या या समितीच्या सन्माननिय पदाधिकाऱ्यांना दिसत नाही का? की
ही समिती कानडोळा करीत आहे? हा सवाल उपस्थित होतो.

“ग्रीन सिटी” मूल हा दस्तुरखुद्द पालकमंत्री ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार
यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.मग खाजगी ट्रॅव्हल्स वाहनतळ व थाबे यामुळे शहरातून धावणाऱ्या महामार्गांवर अपघाताचे ब्लॅक स्पॉट होत असतील
तर वाहतूक सुरक्षा समिती ने ही बाब गांभीरतेने घेऊन उपाय योजना करणे
गरजेचे ठरणार आहे असे जाणकारांना वाटते.

जिल्हा रस्ते वाहतूक सुरक्षा समिती मध्ये पोलीस अधीक्षक,आर.टी.ओ.हे
पदाधिकारी आहेत.या दोन यत्रणांची मोठी जबाबदारी ठरते मात्र मूल शहरातील वाहतुकीची कोंडी यावर वाहतुक पोलीस व आर.टी.ओ. या दोघांचे नावे सिमगा साजरा होत असूनही वाहनतळ व्यवस्था करणयास
विलंब का?हा जनतेचा सवाल पुढे येत आहे.

चंदपूर जिल्हयात रस्ते सुरक्षा सप्ताहाचे बैनर लावण्यापलीकडे काही विशेष होताना दिसत नाही.तत्कालीन उप प़ादेशिक परिवहन अधिकारी विश्वाम्भर शिंदे यांचे काळात यासमितीचे काम दिसत होते.साधारण
जनतेला ही समिती ज्ञात होती.हे विशेष.

ट्रॅव्हल्स वाल्यांची मुजोरी इतकी विकोपाला गेली की या जिवघेण्या
विषयावर भाष्य करणाऱ्यांनाच वाट लावण्याची धमकी देण्यात येते अशी
चर्चा शहरात आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे