spot_img
Sunday, April 19, 2026
HomeMaharashtraहे तर ना.सुधिरभाऊ च्या महतकार्याला वाहतुक पोलिस व आर.टी.ओ.चेआव्हानच?

हे तर ना.सुधिरभाऊ च्या महतकार्याला वाहतुक पोलिस व आर.टी.ओ.चेआव्हानच?

  • ट्रॅव्हल्स वाहनतळ शहराबाहेर हटविण्याची मागणी कायम.

भाग……५

शहरातून धावणाऱ्या दुपदरी मार्गावर अतिक्रमण करून सुरक्षीत वाहतुकीची ऐशीतैशी करणारा खाजगी ट्रॅव्हल्स चा थांबा व वाहनतळ शहराबाहेर अथवा महामार्गापासून दूर नियोजित करण्यात स्थानीक प्रशासन व पोलिस यंत्रणेने पुढाकार घ्यावा अशी मागणी
मूल शहरातील जनता करीत आहे.

गांधी चौकालगत अथवा अगदी बस स्थानकावर थाबणाऱ्या ट्रॅव्हल्स मुळे
वाहतुकीची मोठी कोंडी होत असून या खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांच्या मुजोरीमुळे या महामागांवरून चालणारे नागरीक कमालीचे त्रस्त झाले असल्याची ओरड सुरू असूनही नियमबाहय खाजगी वाहतुक कशी काय सुरू आहे असा संतप्त सवालही विचारला जात आहे.

पोलिस प़शाशन व आर. टी.ओ.ला जी काही मांडवली करायची करावी पण शहरवासियांच्या जिवनाशी खेळू नये व खाजगी ट्रॅव्हल्सना शहराबाहेर धंदा करायला लावावे अशी मागणी जोर धरत आहे.

पालकमंत्री यांनी लक्ष दयावे.


क्षेत्राचे आमदार व जिल्हयाचे पालकमंत्री यांनी मूल शहराला “ग्रीन सिटी” बनविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे हे जगजाहीर आहे.
ना.सुधीरभाऊ मुनगंटीवर यांच्या प़यत्नातून व कल्पनेतून शहरातून धावणाऱ्या महामार्गाचे दुपदरीकरण,सुशोभिकरण करण्यात आले व वाहतुकीची कोंडी दूर सारुन अपघाताची भिती घालविण्याचा प़यत्न
झाला हे मूल पोलिस, व आर.टी.ओ.ला ज्ञात असून सुद्धा नियमबाह्य ट्रॅव्हल्स वाहतुकीची जत्रा भरविण्याचा घाट का घातला जात आहे?असा संताप ही व्यक्त होत आहे.चंदपूर आर.टी.ओ.सुद्धा ट्रॅव्हल्स मागे
३५०० ते ४००० महिनेवारी घेऊन मूल शहराची वाहतुक सुव्यवस्थेची वाट लावत असल्याचे बोलले जाते.

ना.सुधिर मुनगंटीवार यांची अपेक्षा व ग्रीन सिटी मागची मेहनत बेकामी करून बदनाम करण्याचा आर.टी.ओ.व वाहतुक पोलिसांचा डाव तर नाही ना? असाही सवाल उपस्थित होत आहे.

गत ९ सालात ना.मुनगंटीवार यांनी मूल शहराचे स्वरूप बदलविले.स्वच्छता,सुरळीत वाहतुक, शहराची सुंदरता डबघाईस येऊन

ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतुत्व व कतुत्वाला अबाधीत ठेवण्यासाठी आता ट्रॅव्हल्स थांबे व वाहनतळ महामार्गावरून हटवावे व शहराबाहेर व्यवस्था करावी ही मूलनगरवासियांची मागणी व अपेक्षा
किती पूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे