spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtråखाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांची मुजोरी व वाहतुक पोलीसांची मांडवली….?̊

̊खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांची मुजोरी व वाहतुक पोलीसांची मांडवली….?̊

̊शहरातील महामार्ग बनतोय “ब्लॅकस्पॉट”?
̊
̊ मूल शहरातून जाणाऱ्या चंदपूर -गडचिरोली महामागांचे दुपदरीकरण झाले खरे पण वाहतुकीची कोंडी संपता संपेना.अनेक कारणे असली तरी येथील वाहतुक पोलिसांची मांडवली व खाजगी ट्रॅव्हल्स चालकांची मुजोरी ही शहरातील असुरक्षीत, जिवघेण्या वाहतुकीमागील मोठे कारण शहरातील
जनता समजते. खाजगी प़वासी वाहतुकीच्या साऱ्या नियमांची ऐशीतैशी करून शहरवासियांच्या सुरक्षिततेची वाट लावण्यापेक्षा एस.टी.
महामंडळाचे डेपोतच खाजगी ट्रॅव्हल्सचे थांबे अधिकृत का करीत नाही? हा संतप्त सवाल उपस्थीत झाल्यास नवल नसावे.


̊मूल पोलिस ठाण्यातील वाहतुक पोलीस शहरातील अडगडीची वाहतुक
कोंडी सोडविण्यापेक्षा भलतीकडेच धावपळ करून खाजगी ट्रॅव्हल्स चालकांना,मालकांना खाली सुट देऊनसुरक्षीत वाहतूक नियमांची वाट लावतात असा गंभीर आरोप होताना दिसतो.

अगदी बसस्थानकाच्या तोंडावर महामार्गाचे मधोमध गाडया उम्या ठेवून पुकारा करणारे कुणामुळे मस्तावले व अपघाताना आमंत्रित करीत आहेत? हा गोरखधंदा गेल्या अनेक सालापासून कसा काय सुरू आहे? हा सवाल शहरातील जनते समोर कायम आहे.

एकतर आधीच बसस्थानकासमोर व्यापाऱ्यांनी रस्तावर घाला घालून
महामार्ग संकुचित केला आहे.वरून या खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांनी अधिकृत वाहनतळ सोडून महामार्गाचे दुतर्फा आपली ठेकेदारी सुरू केली आहे.


रस्ता दुपदरीकरण होऊनही मूल शहरात वाहतुक पोलिसांची मांडवली
व खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांची मुजोरी यामुळे मूल शहरातून जाणारा महामार्ग्ब्लॅकस्पॉट” झाला हा नगरवासियांचा स्पष्ट आरोप आहे.

( क्रमशा)
̊
̊

̊

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे