spot_img
Wednesday, April 29, 2026
HomeMaharashtraलग्नाचा वाढदिवस, आक्षेपार्ह व्हिडीओ अन्... छत्रपती संभाजीनगरमधल्या हत्याकांडाचं धक्कादायक सत्य समोर

लग्नाचा वाढदिवस, आक्षेपार्ह व्हिडीओ अन्… छत्रपती संभाजीनगरमधल्या हत्याकांडाचं धक्कादायक सत्य समोर

[ad_1]

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या (chhatrapati sambhaji nagar) वाळूज औद्योगिक परिसरातील शुक्रवारी एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह (Crime News) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. पती पत्नी आणि चार वर्षांची मुलगी अशा तिघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले होते. मात्र पतीने पत्नी आणि मुलीची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. 

छत्रपती संभाजी नगरच्या वाळूज औद्योगिक परिसरातील वळदगाव मध्ये एकाच कुटुंबातील तिघांचे गळफास घेतलेले मृतदेह आढळून आले होते. मोहन प्रताप डांगर (28), पूजा मोहन डांगर (24) आणि श्रेया मोहन डांगर (4) अशी मृतांची नावे होता. दरम्यान, सुरुवातीला हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आता या एकाच कुटुंबातील तीन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी धक्कादायक खुलासा झालाय. 

लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने घराशेजारीच सासुरवाडीत असलेल्या पत्नीला घरी नेऊन संशयखोर पतीने तिचा व चार वर्षांच्या मुलीचा खून केल्याचे समोर आले आहे. लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आरोपी मोहन डांगर बायको पूजा आणि चार वर्षांची मुलगी श्रेयाला घरी घेऊन आला होता. लग्नाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर मोहनने पूजा आणि श्रेयाला एकाच दोरीने गळफास दिला आणि त्यांची हत्या केली. त्यानंतर स्वतःदेखील गळफास घेत आत्महत्या केली.

मोहनला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. धक्कादायक बाब म्हणजे मोहनने याआधी पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल सुद्धा केले होते. याआधी मोहनवर प्राणघातक हल्ला केल्याच्या आणि अन्य कौटुंबिक वादाच्या तक्रारी  सातारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते. त्याप्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु असल्याची माहिती मुलीच्या आईने दिली आहे.

नेमकं काय घडलं?

मोहन सासूच्याच शेजारी भाड्याने घर घेऊन राहत होता. मोहनची मुलगी श्रेया शेजारीच राहणाऱ्या आजीकडे रोज चहा घेण्यासाठी जायची. मात्र शुक्रवारी ती घरी न आल्याने तिच्या आजीने मोहनच्या घराचा दरवाजा ठोठवला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यातच गुरुवारी दोघांमध्ये जोरदार भांडण सुरु असल्याचे ऐकले होते. त्यामुळे त्यांचा संशय बळावला. त्यांनी शेजारच्यांच्या मदतीन दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी घरामध्ये मोहन, पूजा व श्रेया लोखंडी अँगलला दोरीच्या मदतीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले होते.

गुरुवारी रात्री मोहन लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक घेऊन घरी आला होता. त्यावेळी त्याने पत्नीला घरी येण्याची विनंती केली. केकच्या मोहापायी चिमुकली श्रेया देखील मोहनसोबत गेली. केप कापल्यानंतर मोहनने पत्नी आणि मुलीची हत्या केली आणि स्वतःला देखील संपवले.



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे