spot_img
Tuesday, April 28, 2026
HomeMaharashtraPune Crime : 'तुझा माज उतरवतो...'; पत्नीला बेडरुममध्ये ओढत नेले अन्... पतीने...

Pune Crime : ‘तुझा माज उतरवतो…’; पत्नीला बेडरुममध्ये ओढत नेले अन्… पतीने गाठली क्रौर्याची परिसीमा

[ad_1]

Pune Crime : पुण्यात (Pune News) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये (Crime News) सातत्याने वाढ होताना दिसत आहे. एकीकडे टोळीयुद्धाच्या घटना घडत असताना घरगुती हिंसाचाराच्या घटनाही वाढताना दिसत आहेत. असाच काहीसा प्रकार पुण्यातील कोंढवा भागातून समोर आला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा क्रूरपणे छळ केला आहे. माथेफिरू पतीने पत्नीला हिटरने चटके देऊन मारहाण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी  40 वर्षीय नराधम पतीला पोलिसांकडून (Pune Police) अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेने याप्रकरणी कोंढवा पोलिसांत तक्रार दिली होती.

आरोपी पतीला अटक

30 एप्रिल रोजी दरम्यान हा सर्व धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपी पतीने हे धक्कादायक कृत्य केले आहे. पीडित महिलेने या घटनेनंतर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनाही हा घटनाक्रम ऐकून धक्काच बसला. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी तात्काळ 40 वर्षीय पतीला अटक केली आहे. पतीच्या अमानुष अत्याचारानंतर पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पत्नीला मोबाईल घेतलेले पाहिलं अन्…

पीडित महिलेला चार मुले असून ती पतीसोबत राहत होती. पत्नीच्या हातात मुलीचा मोबाईल पाहून पतीने ‘तू कोणाबरोबर बोलत तर नाहीत ना’ असे विचारले. यावरुन पतीला राग अनावर झाला होता. त्यानंतर माथेफिरू पतीने पत्नीला ओढत बेडरुमध्ये नेले आणि दरवाजा बंद केला. यानंतर पत्नीचे हातपाय ओढणीने बांधून तिच्यावर अत्याचार सुरु केले. यावेळी पतीने पाणी गरम करण्याचे हिटर गरम केले आणि पत्नीच्या गुप्तांगावर चटके दिले. त्यानंतर पतीने पीडित महिलेवर शारिरीक अत्याचार देखील केले.

खलबत्याने केली जबर मारहाण

या सर्व अत्याचारानंतर पती इथेच थांबला नाही. तुला खूप माज आला आहे, तुझा माज उतरवितो, म्हणत पतीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि पीडित महिलेच्या डोक्यात, डोक्यात, हाता पायावर खलबत्याने जबर मारहाण केली. महिलीचा आरडाओरडा ऐकून बाहेर असलेली देखील मोठमोठ्याने रडू लागली. तेव्हा आरोपी पतीने बेडरुमचा दरवाजा उघडला. त्यानंतर आरोपीने मुलींसमोरच शिवीगाळ करत अश्लिल भाषेत धमकी देखील दिली. या सर्व प्रकारानंतर जखमी झालेल्या महिलेला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दुसरीकडे, लग्नास नकार दिल्याने चिडलेल्या फेसबुकवरील फ्रेन्डने दोघांच्या बोलण्याचे व्हिडिओ युट्यूबवर टाकल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या हिंजवाडीमध्ये घडलाय. या प्रकरणी सुशील आठवले याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे