spot_img
Monday, April 27, 2026
HomeMaharashtraराज्यातील मोठी बातमी! शरद पवारांनी केली निवृत्तीची घोषणा, म्हणाले "यापुढे मी..."

राज्यातील मोठी बातमी! शरद पवारांनी केली निवृत्तीची घोषणा, म्हणाले “यापुढे मी…”

[ad_1]

Sharad Pawar Announce Retirement:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. शरद पवारांनी त्यांचं आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ (Lok Majhe Sangati) पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना ही घोषणा केली आहे. कुठे तरी थांबायचा विचार केला पाहिजे. जास्त मोह करणं योग्य नाही. मी तशी भूमिका घेणार नाही असं सांगत शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी नव्या अध्यक्षांसंबंधी निर्णय घ्यावा असंही शरद पवार यांनी सांगितलं आहे. दरम्यान शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. शरद पवारांनी निवृत्तीचा आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. 

शरद पवारांनी नेमकं काय सांगितलं?

“महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेने 56 वर्षं मला सत्तेच्या राजकारणात ठेवलं. अजूनही माझी राज्यसभेची तीन वर्षं बाकी आहेत. इतकी संधी आजपर्यंत कोणालाही मिळालेली नाही. इतकी वर्षं सतत लोकसभा, राज्यसभेत असणारी व्यक्ती मला पाहायला मिळालेली नाही. करुणानिधी हे एकमेव आहेत, ज्यांचा इतका मोठा कालखंड होता. अडवाणी, वाजपेयी यांना पराभव पाहावा लागला होता. महाराष्ट्राच्या जनतेने मला कधी पराभल दाखवला नाही. 63 वर्षांपासून माझा प्रवास सुरु असून यातील 56 वर्ष सत्तेत आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं. 
 
“मी आता निवडणुकीला उभा राहणार नाही. यापुढे देशाच्या, राज्याच्या प्रश्नात लक्ष घालणार. याशिवाय इतर कोणतीही जबाबदारी घेणार नाही. इतकी वर्षं संधी झाल्यानंतर कुठे तरी थांबायचा विचार केला पाहिजे. जास्त मोह करणं योग्य नाही. मी तशी भूमिका घेणार नाही. त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल, पण मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय आज घेतला आहे,” अशी घोषणा शरद पवारांनी यावेळी केली. 

पुढे त्यांनी सांगितलं की “मी निवृत्ती जाहीर करत असलो तरी शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा आणि सांस्कृतिक यामध्ये अधिक काम करण्याचा मानस आहे. तसंच युवक, युवती, विद्यार्थी यांना अधिक प्रोत्साहित करत समाजातील कमकुवत घटकाकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. मी अनेक सार्वजनिक संस्थांमध्ये काम करतो. या सर्व संस्थांमध्ये मी पदाधिकारी आहे. हे काम मी असंच सुरु ठेवणार आहे. वसंतदाद शुगर इन्स्टिट्यूटमध्ये अधिक वेळ देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. गेल्या 60 वर्षांत महाराष्ट्राने मला खंबीरपणे साथ दिल्याचं मी विसरु शकणार नाही”.

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची समिती नेमावी असं मी प्रफुल्ल पटेल यांना सुचवणार आहे. ही समिती नव्या अध्यक्षांचा निर्णय घेईल. या समितीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, फौजिया खान अशा अनेकांचा समावेश असणार आहे. मी निवृत्ती घेत असलो तरी ही निवृत्ती सार्वजनिक क्षेत्रातून नाही,” असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. मी कुठेही असलो तरी सकाळपासून सर्वांसाठी उपलब्ध असेन असंही शरद पवार म्हणाले. 

मात्र शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा करताच कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी नेत्यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण शरद पवारांनी निवृत्ती मागे घ्यावी यावर कार्यकर्ते ठाम आहेत.



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे