spot_img
Monday, April 27, 2026
HomeMaharashtraन. प. चे चुकीचे धोरणाने करोडोची आवक आटली.

न. प. चे चुकीचे धोरणाने करोडोची आवक आटली.

न.प. चे मोठे आर्थिक नुकसान

चंद्रपुर/मुल ( तालूका प्रतिनिधी )न.प. बांधकाम विभागाअंतर्गत मोठया प्रमाणात सुरु असलेली अनियमितता
व चुकीचे धोरण यामुळे न.प. चे प्रचंड आर्थिक नुकसान होत असल्याचे चित्र पुढे येत आहे. न.प. बांधकाम विभागाचे उदासिनता च चुकीचे धोरणामुळे शहराअंतर्गत बांधकाम मंजूरीची अनेक प्रकरणे प्रलंबीत होत असून त्रासलेल्या अनेक बांधकाम कर्त्यांनी विना परवाना बांधकाम सुरु केल्याचे दिसत आहेत. यामुळे फार मोठे बांधकाम करापासून वंचीत होवून न.प. ला मोठा आर्थिक फटका बसत आहे.शहरात अशा विना परवाना बांधकाम करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या संख्येत असल्याचे बोलले जाते.प्रत्यक्षात नगर वासीय रहिवासी क्षेत्रात नविन बांधकाम व नुतनीकरण याकरीता मोठया प्रमाणात प्रकरण सादर करीत असतात. बांधकाम नियमानुसार होत असेल, कुणाची तक्रार नसेल, टायटल क्लिअर असेल तर त्वरीत बांधकाम मंजरी द्यायला हवी यातून न.प. चे उत्पन्न उभे होत असतांना मात्र न.प. बांधकाम अभियंता यांचे हेकेखोरपणा व चुकीचे धोरणामुळे आर्थीक नुकसान होत असल्याची व पर्यायाने अनाधिकृत बांधकामे मोठया प्रमाणात सुरु असल्याची ओरड सुरु आहे.न.प. बांधकाम अभियंता यांनी बांधकाम मंजूरी प्रकरण सादर होताच मोका चौकशी त्वरीत करावी, जागेचे कागदपत्रे त्वरीत तपासावे व न.प. नियमानुसार नकाशा तपासावा मात्र हेतुपूर्वक दिरंगाई व चुकीचे धोरण राबवून न.प. चे मोठे आर्थिक नुकसान टाळावे अशी मागणी जागरुक नागरीक करीत आहे. जे बांधकाम, झालेले आहेत. त्या बांधकामास सुद्धा नियमीत करून विकासनिध घ्यावे बांधकाम मंजूरीतुन व नंतर मालमत्ता करातून न.प. ला करोडो रुपये विकास निधी चे रुपात मिळतात. व यातून मोठी विकासकामे करता येतात. मात्र बांधकाम अभियंता यांचे चुकीचे धोरण अनियमीतता यामुळे बांधकाम निधी व मालमत्ता कर नाहक बुडत असल्याची तक्रार पालकमंत्री तथा क्षेत्राचे आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचेकडेही करण्यात आल्याचे कळते.मूल शहरात सध्या प्रशासक राज आहे. या स्थितीत शासन धोरण व नियमीतता राबविण्यासाठी अधिकाऱ्यांना मोठी मुभा असते. मात्र मूल न.प. अंतर्गत बांधकाम अभियंताच चुकीचे धोरण राबवून करोडोचे आर्थिक नुकसान करीत असल्याने शंका कुशंकाना पेव फुटले आहे.न.प. प्रशासक व मुख्याधिकारी यांनी न.प. बांधकाम अभियंत्याचे बेलगाम वर्तनुकीस आळा घालावा. अशी मागणी होत आहे. न.प. अभियंत्याचे चुकीचे धोरणाने शहरातील घरकुल बांधकामे मोठया प्रमाणात रखडली आहेत हे विशेष.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे