नगर प्रशासन चे कोटयावधी चे नुकसान
मुल शहरातील कित्तेक वार्डमध्ये तसेच मुख्य रस्त्यावर अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर झाली आहे. यासंदर्भात समाजातील जागृत नागरिकांनी व प्रसार माध्यमांनी आवज उठवला आहे. परंतु मुल नगरपालिकेचे कुंभकर्णी झोपेतील प्रशासन अजून जागे होत नाही. यामुळे या बांधकामांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद तर नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. अशा या प्रकारा मुळे नगर परिषद चे कोटयावधी चे नुकसान होत आहे
मुल नगरपालिकेने एकीकडे शहरातील अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी प्रत्येक नगरपालिका विभागात कार्यकारी अभियंत्यांची नियुक्ती केली. परंतु त्यानंतरही दहिसर परिसरात भूमाफियांनी पालिका अधिकाऱ्यांशी साटेलोटे करत अनधिकृत बांधकामे करत आहेत. त्यामुळे कार्यकारी अभियंत्यांची नियुक्ती करून नक्की महानगरपालिकेने काय साध्य केले? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करत आहेत.




