चंद्रपूर: -बल्लारपूर येथील तहसीलदार आणि तलाठ्याला लाच मागणे चांगलेच महागात पडले आहे. दोन लाख 20 हजार रुपयाची लाचेची मागणी करणाऱ्या विरुद्ध लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून तहसीलदार अभय अर्जुन गायकवाड ला ताब्यात घेतले आहे तर कवडजई साझ्याचा तलाठी सचिन पुकळे याचा शोध ACB घेत आहे.
तक्रारदाराला मुरूम प्रकरणात कारवाई न करण्याच्या मोबदल्यात दोन लाख 20 हजार रुपयाची या लोकसेवकांनी मागणी केली होती. या आधी 1 लाख 19 हजार स्वीकारले असताना 1 लाख रुपया साठी आणखी या लोकसेवकांनी तक्रार दाराला तगादा लावला होता.
ACB नी पडताळणी करून या तहसीलदार आणि तलाठी च्या मुसक्या आवळत बल्लारपूर येथे गुन्हा नोंदवत आज बल्लारपूर तहसीलदार ला ताब्यात घेतले आहे.चंद्रपूर ACB ने केलेल्या कारवाई ने महसूल प्रशासनातला भ्रष्टाचार समोर आला आहे.सदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे